चिपळूण - हॅण्डलिंग चार्जमुळे नामचा खर्च वाढला

चिपळूण - हॅण्डलिंग चार्जमुळे नामचा खर्च वाढला

वाशिष्ठीतील गाळाचे राजकारण भाग २........ लोगो

फोटो ओळी
-RAT२१p८.JPG ः KOP२३L८४२८४
चिपळूण ः बाजारपूल येथील हे बेट काढण्याचे काम नाम फाउंडेशन लवकरच हाती घेणार आहे.
----------

हॅण्डलिंग चार्जमुळे नामच्या खर्चात दिसते वाढ
समन्वयक जानवलकर ; ओला गाळ सुकल्यावर वाहतूक
मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ ः वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभगाला ६५.४० रुपये प्रती घनमीटर खर्च आला. तसेच नाम फाउंडेशनला ६९.५४ रुपये प्रती घनमीटर इतका खर्च आला. जलसंपदापेक्षा नाम फाउंडेशनचा खर्च प्रती घनमीटर जास्त आहे. हा अतिरिक्त खर्च हॅण्डलिंग चार्ज असल्याची माहिती नाम फाउंडेशनचे चिपळूणमधील समन्वयक समीर जानवलकर यांनी दिली.

ते म्हणाले, ‘पहिल्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम नाम फाउंडेशनलाच का दिले गेले? यामागील राजकारण मला माहित नाही. आम्हाला जलसंपदा विभाग, चिपळूण पालिका आणि नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पहिल्या टप्प्यातील गाळ पूर्णपणे काढायचा आहे. आम्ही एक लाँग रिच बूम आणला आहे. तो गोवळकोट भागात वापरणार आहोत. गेल्या वर्षी आम्ही पाण्यातून गाळ काढून तो किनारी ठेवला कारण, गाळ ओला असल्यामुळे त्याची वाहतूक करता येत नव्हती. किनारी ठेवलेला गाळ सुकल्यानंतर त्याची वाहतूक केली. त्यामुळे नाम फाउंडेशनला प्रती घनमीटर जास्त खर्च आला असेल. त्याशिवाय दुसरे कारण नाही.
वाशिष्ठी नदीखोऱ्यातील सरासरी पर्जन्याच्या आधारे येणारा पूर विसर्ग निश्चित करून असलेल्या काटछेदाद्वारे नदीची आताची
वहनक्षमता निश्चित करणे आवश्यक आहे. ब्ल्यू लाईनचा महत्तम विसर्ग किंवा हा विसर्ग अतिजास्त प्रमाणात असल्यास मागील किमान १० वर्षाचा सरासरी पर्जन्यमानाचा विसर्ग विचारात घेऊन आता गाळ काढणे गरजेचे आहे. नदीची सद्यःस्थितीतील वहनक्षमता लक्षात घेऊन कमाल विसर्ग जाण्यासाठी नदीचे किती रूंदीकरण व खोलीकरण आवश्यक आहे याप्रमाणे नदीचा विस्तारित काटछेद व उतार निश्चित केला पाहिजे.
काढलेला गाळ पूररेषेच्या बाहेर टाकणे आवश्यक आहे. त्यासाठी वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. स्थानिक लोक त्यांच्या मोकळ्या जागांमध्ये गाळ टाकण्यास विरोध करत आहेत. काही लोक नदीतून गाळ काढण्यास विरोध करत आहेत. नागरिकांची गैरसमज दूर करून गाळ काढावा लागणार आहे.

कोट
वाशिष्ठी नदीतून जलद गाळ काढण्याबाबत जलसंपदा विभागाकडून पर्याय सुचवण्यात आले होते. ठेकेदारांमार्फत गाळ काढल्यास त्यासाठी किमान २०० रुपये प्रती घनमीटर इतका खर्च येईल. यांत्रिकी विभागाने गाळ काढल्यास पुरेशी यंत्रणा विकत घ्यावी लागेल. नाम संस्थेला इंधन पुरवठा करून गाळ काढण्याचे काम केल्यास यंत्रणा खरेदीवर होणारा शासनाचा खर्च वाचेल, असे सुचवण्यात आले होते. गोवळकोट, उक्ताड, बाजारपूल या ठिकाणी ७ मशीन आणि १७ डंपर लावून गाळ उपसा सुरू आहे.
- शाहनवाज शाह, समन्वयक, नाम फाउंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com