
खेड ः महावितरणची थकबाकी 7 कोटीवर
खेड, दापोली, मंडणगडची थकबाकी सात कोटीवर!
‘महावितरण’ला झटका; ग्राहकांना वीजबिल भरणा करण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २२ः ‘महावितरण’च्या खेड, दापोली व मंडणगड विभागीय क्षेत्रात घरगुती, व्यापारी, औद्योगिक, शेती, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, शासकीय तथा निमशासकीय असे एकूण ३१ हजार ६८ वीजग्राहक असून, या ग्राहकांकडे सात कोटी ४८ लाख दोन हजार रुपयांची वीजबिल थकबाकी आहे.
‘महावितरण’च्या विभागीय कार्यक्षेत्रात दापोली नं. १, दापोली नं. २, खेड, लोटे, मंडणगड विभाग येत असून, खेडमधील सहा हजार ८२८ ग्राहकांची एक कोटी ७३ लाख ३८ हजार इतकी थकबाकी आहे. यात पाच हजार ६५२ घरगुती ग्राहकांची ३९ लाख २२ हजार इतकी थकबाकी आहे. ७११ व्यापाऱ्यांची १५ लाख ९७ हजार, ३५ औद्योगिक कंपन्यांची आठ लाख ३७ हजार, १११ शेतकऱ्यांची एक लाख ४६ हजार, ९७ दिवाबत्तीची ८६ लाख २६ हजार, ५९ पाणीपुरवठा योजनेची १२ लाख ५४ हजार, १६३ शासकीय व निमशासकीय कार्यालयांची नऊ लाख ५७ हजारांची थकबाकी आहे. लोटे विभागात चार हजार ७५० ग्राहकांची एक कोटी ४२ हजार इतकी थकबाकी असून, यात चार हजार ७४ घरगुतीची २७ लाख आठ हजार, २३९ व्यापाऱ्यांची सहा लाख ६४ हजार, ४४ औद्योगिक कंपन्यांची पाच लाख दोन हजार, एक हजार १२५ शेतकऱ्यांची एक लाख ६२ हजार, १९३ दिवाबत्तीची एक कोटी २२ लाख १९ हजार, ४३ पाणीपुरवठा योजनेची दोन लाख ३७ हजार, १३२ शासकीय/निमशासकीय कार्यालयांची दोन लाख ५० हजारांची थकबाकी आहे.
मंडणगडमध्ये सहा हजार ५३९ ग्राहकांची एक कोटी ७१ लाख १८ हजारांची थकबाकी असून, पाच हजार २८५ घरगुतींची ४६ लाख २६ हजार, ३६१ व्यापाऱ्यांची सात लाख ८२ हजार, ४२ औद्योगिक कंपन्यांची चार लाख ३३ हजार, ४५३ शेतकऱ्यांची १२ लाख ७६ हजार, १५६ दिवाबत्तीची ८९ लाख ८६ हजार, ५६ पाणीपुरवठा योजनेची तीन लाख ७४ हजार, १८६ शासकीय/निमशासकीय कार्यालयांची सहा लाख ४१ हजारांची थकबाकी आहे, तसेच दापोली क्रमांक एक व दोन विभाग मिळून १२ हजार ९५१ ग्राहक असून, दोन कोटी ३६ लाख तीन हजारांची वीजबिल थकबाकी आहे. यात १० हजार ४१४ घरगुती ग्राहकांची ७४ लाख ७६ हजार, ९५३ व्यापाऱ्यांची २३ लाख १५ हजार, ९४ औद्योगिक कंपन्यांची ११ लाख ९१ हजार, एक हजार २० शेतकऱ्यांची १८ लाख ५५ हजार, ९८ दिवाबत्तीची ३२ लाख ४९ हजार, ११० पाणीपुरवठा योजनेची १६८ लाख ६६ हजार, तर २६२ शासकीय/निमशासकीय कार्यालयांची सहा लाख ४९ हजारांची थकबाकी आहे.
चौकट
धडक वसुली मोहीम
मार्चअखेर नवीन आर्थिक वर्षापूर्वी जुनी वीजबिल थकबाकी भरणा करून घेण्यासाठी ‘महावितरण’कडून वसुली पथक नेमले आहे. जनमित्र व अधिकारी यांच्यामार्फत या मोहिमेस सुरुवात करण्यात आली असून, ग्राहकांनी वीजबिल भरणा करून ‘महावितरण’ला सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय कार्यकारी अभियंता विशाल शिवतरे यांनी केले आहे.