
रत्नागिरी- कोहिनूर हेरिटेज सोसायटीमध्ये शिवजयंती
-rat21p2.jpg-KOP23L84234
रत्नागिरी : कोहिनूर हेरिटेजच्या सी विंगमध्ये छत्रपतींच्या प्रतिमेला अभिवादन करताना रहिवासी.
कोहिनूर हेरिटेज सोसायटीमध्ये शिवजयंती
रत्नागिरी, ता. २१ः शहरातील डोंगरमळा, खालची आळी येथील कोहिनूर हेरिटेज सोसीयटीच्या सी-विंगमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व सदनिकाधारकांनी एकत्र जमून इमारतीच्या प्रवेशद्वारातील छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सोसायटी कार्यालयात छत्रपतींच्या प्रतिमेचे सर्व सदनिकाधारकांनी पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. छत्रपतींची आरती करून पेढे वाटण्यात आले. विविध कार्यक्रमांमध्ये सोसायटीमधील आकाश पाटील, आदित्य पाटील, अवधूत जाधव, अथर्व पाटील, आर्या रहाटे, आदिती रहाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचे प्रसंग कथन करून डोळ्यासमोर इतिहास उभा केला आणि कार्यक्रमाला रंगत आणली. या छोट्या शिवप्रेमींना सोसायटीमधील महिलांनी बक्षिसे दिली. सूत्रसंचालन गिरीश सावंत यांनी केले.