राजापूर-गाळ उपशासाठी राजापूर भाजपाची 41 हजाराची देणगी

राजापूर-गाळ उपशासाठी राजापूर भाजपाची 41 हजाराची देणगी

पान ५ साठी

८४३२४

गाळ उपशासाठी
भाजपची ४१ हजार देणगी
राजापूर, ता. २१ ः शहरातील कोदवली नदीपात्रातील सुरू असलेल्या गाळ उपशाच्या कामासाठी तालुका भारतीय जनता पक्षातर्फे मदतीचा हात पुढे करण्यात आला. गाळ उपशाच्या कामासाठी तालुका भाजपतर्फे ४१ हजार रुपयांची देणगी देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. देणगीची ही रक्कम पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्याकडे भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव आणि सहकाऱ्यांनी सुपूर्द केली.
नाम फाउंडेशनचे सहकार्य, महसूल विभाग व पालिकेचा पुढाकार आणि लोकसहभागातून गेल्या काही दिवसांपासून गाळ उपसा सुरू आहे. या गाळ उपशाच्या कामासाठी जिल्हा नियोजनमधूनही निधी उपलब्ध झाला. त्याचवेळी अनेकांनी सामाजिक बांधिलकीतून गाळ उपशाच्या कामासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. तालुका भाजपतर्फेही सामाजिक बांधिलकीतून गाळ उपशाच्या कामासाठी ४१ हजार रुपयांची देणगी दिली. या वेळी पालिकेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव, सूरज पेडणेकर, अ‍ॅड. सुशांत मराठे, माजी नगरसेविका शीतल पटेल, माजी नगरसेवक नागेश शेट्ये, रसिका कुशे, सोनल केळकर, शीतल रहाटे यांच्यासह अन्य भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com