महात्मा गांधी स्मारकासाठी पाठपुरावा करू

महात्मा गांधी स्मारकासाठी पाठपुरावा करू

swt2123.jpg
84412
शिरोडाः डॉ. अमेय देसाई यांनी गांधीनगर येथील नियोजित गांधी स्मारक स्थळी भेट दिली. यावेळी प्रसन्ना देसाई व इतर भाजप पदाधिकारी.

गांधी स्मारकासाठी पाठपुरावा करू
डॉ. अमेय देसाईः शिरोड्यात नियोजित स्मारकस्थळी दिली भेट
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २१ः शिरोडा येथील ऐतिहासिक मिठाचा सत्याग्रहाच्या ठिकाणी महात्मा गांधी स्मारक होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजक व विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय यांचे विश्वासू डॉ. अमेय देसाई यांनी दिली.
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसेच लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत शासकीय दफ्तरी झालेला पाठपुरावा जाणून घेऊन येणाऱ्या समस्यांवर योग्य तो तोडगा काढण्यासाठी विधान परिषद आमदार भारतीय यांच्या माध्यमातून लवकरात लवकर गांधी स्मारक प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
डॉ. देसाई यांनी शिरोडा गांधीनगर येथील नियोजित गांधी स्मारक स्थळी भेट दिली. यावेळी शिरोडा ग्रामपंचायतीने गांधी स्मारकाबाबत केलेला प्रस्ताव व आतापर्यंतचा झालेला पाठपुरावा याबाबत माजी सरपंच मनोज उगवेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रीतेश राऊळ, माजी उपसरपंच राहुल गावडे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मयुरेश शिरोडकर यांनी माहिती दिली. स्मारकासंदर्भात कमिटी बनवून मंत्रालयामध्ये सर्वतोपरी मदत देण्याची आपली तयारी असल्याचे डॉ. देसाई यांनी सांगितले.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, वेंगुर्ले तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, शिरोडा ग्रामपंचायत सदस्या अर्चना नाईक, हेतल गावडे, भाजपचे रेडी, शिरोडा, आरवली शक्ती केंद्र प्रमुख जगन्नाथ राणे, विदयाधर धानजी, महादेव नाईक, शिरोडा शहर उपाध्यक्ष संतोष अणसूरकर, शहर युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत, ज्येष्ठ पदाधिकारी मनोहर होडावडेकर, अनिल गावडे, बाळकृष्ण परब, भाजप पदाधिकारी विकास परब, जितेंद्र आजगावकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com