राजापूर-रानतळेतील पिकनिक स्पॉटची नासधूस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-रानतळेतील पिकनिक स्पॉटची नासधूस
राजापूर-रानतळेतील पिकनिक स्पॉटची नासधूस

राजापूर-रानतळेतील पिकनिक स्पॉटची नासधूस

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२१p४९.jpg ःKOP२३L८४४२१ राजापूर ः रानतळे येथील पिकनिक स्पॉटमध्ये अज्ञाताकडून करण्यात आलेली नासधूस.

रानतळेतील पिकनिक स्पॉटची नासधूस

पोलिसात तक्रार ; गेट तोडले, शोभेच्या वस्तू फोडल्या
राजापूर, ता. २१ ः नगर पालिकेने हाती घेतलेल्या शहरातील रानतळे येथील पिकनिक स्पॉटच्या सुशोभीकरणाला अज्ञातांनी गालबोट लावले आहे. या ठिकाणी असलेला लोखंडी गेट तोडून या स्पॉटमध्ये प्रवेश करून वाढदिवस साजरा करताना या ठिकाणी करण्यात आलेले रंगकाम खराब करून शोभेसाठी ठेवलेल्या वस्तूंची तोडफोड करत अज्ञातांकडून धुडगूस घालण्यात आला आहे. या कृत्याविरोधात सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणी नगर पालिकेने राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रानतळे येथील पिकनिक स्पॉटचेही सुशोभीकरण करण्यात आले आहे. पिकनिक स्पॉट परिसराची रंगरंगोटी करताना टाकाऊपासून विविधांगी टिकाऊ वस्तू तयार करून त्या शोभेसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्याच्यातून पिकनिक स्पॉटला पर्यटनदृष्ट्या वेगळा साज मिळाला आहे. पालिका प्रशासनाच्या या प्रयत्नांना अज्ञाताने गालबोट लावले आहे. त्यामध्ये पिकनिक स्पॉटचे बंद गेट तोडून आत प्रवेश केला. तेथे वाढदिवस केक कापून साजरा करून केकचा कचरा सगळीकडे फेकला. रंगकामाची नासधूस करून या ठिकाणी लावलेल्या शोभेच्या वस्तूही तोडून टाकण्यात आल्या आहेत. या ठिकाणी दारुची रिकामी बाटली तिथे असलेल्या रंगाच्या डब्यात बुडवून ती देखील या ठिकाणी फेकून देण्यात आली आहे. त्यामध्ये सुमारे ३० हजाराचे नुकसान झाल्याचे पालिकेने तक्रारीत नमूद केले आहे. नगर पालिकेचे कर्मचारी या ठिकाणी कामासाठी गेले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ याबाबत मुख्याधिकारी प्रशांत भोसले व मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांना माहिती दिली. त्यानंतर, भोसले व जाधव यांनी तत्काळ पिकनिक स्पॉटवर जाऊन पाहणी केली.