
भवानी पतसंस्थेचे लोकाभिमुख कार्य
swt2125.jpg
84428
बांदाः सोने तपासणी मशिनचे उद्घाटन करताना अतुल काळसेकर. सोबत सरपंच प्रियांका नाईक, नीलेश मोरजकर, पतसंस्था अध्यक्ष वालेतीन आलमेडा आदी.
भवानी पतसंस्थेचे लोकाभिमुख कार्य
अतुल काळसेकरः बांद्यात सोने तपासणी मशिनचे लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २१ः व्यावसायिक स्पर्धेतही येथील श्री भवानी पतसंस्थेने सहकारच्या माध्यमातून ग्राहकांत विश्वासार्हता निर्माण केली. बनावट सोन्याची पारख करता यावी, यासाठी बांद्यात पहिल्यांदाच सोने तपासणी मशिन खरेदी करत ही विश्वासार्हता अधिक जपली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक नेहमीच आपल्या पाठीशी असून भविष्यात सहकार वृद्धिंगत करण्यासाठी बँक आपल्याला निश्चितच पाठबळ देईल, असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथे व्यक्त केला.
श्री भवानी पतसंस्थेत सोने तपासणी मशिनचा प्रारंभ काळसेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सरपंच प्रियांका नाईक, ‘सकाळ’चे येथील प्रतिनिधी नीलेश मोरजकर, संस्थेचे अध्यक्ष वालेतीन आलमेडा, संस्थापक अध्यक्ष अशोक सावंत, उपाध्यक्ष प्रवीण शिरसाट, संचालक अशोक देसाई, सालू परेरा, संजय नाईक, राजेंद्र वाळके, रेश्मा आईर, व्यवस्थापक भिकाजी गवस, सावंतवाडी अर्बन बँकेचे बांदा शाखा व्यवस्थापक आबाजी सावंत आदी उपस्थित होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष आलमेडा यांनी स्वागत केले. काळसेकर यांच्या हस्ते सोने तपासणी मशिनचे उद्घाटन करण्यात आले.
सरपंच नाईक यांनी, श्री भवानी पतसंस्था ही ग्राहकांना लोकाभिमुख सेवा देत असून या पतसंस्थेने ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेसाठी शाखा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या बनावट सोने बँकेत ठेवून पैसे उकळण्याच्या घटना राष्ट्रीयकृत बँकातही घडल्या आहेत. त्यामुळे वेळीच सावध होत भवानी पतसंस्थेने सोने तपासणी मशिन सुरू केली, हे कौतुकास्पद आहे, असे सांगितले. सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी केले.