चिपळूण ः मिरजोळी सरपंच विरोधात अविश्वास ठराव संमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  मिरजोळी सरपंच विरोधात अविश्वास ठराव संमत
चिपळूण ः मिरजोळी सरपंच विरोधात अविश्वास ठराव संमत

चिपळूण ः मिरजोळी सरपंच विरोधात अविश्वास ठराव संमत

sakal_logo
By

मिरजोळी सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

८ पैकी ७ मते ठरावाबाजूने ; मनमानी कारभाराची तक्रार
चिपळूण, ता. २१ ः शहरालगतच्या मिरजोळी ग्रामपंचायतीचे सरपंच मनमानी कारभार करतात. सदस्यांना विश्वासात घेत नाहीत असा आरेप करत सदस्यांनी सरपंच कासम नूरमहंमद दलवाई यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. मंगळवारी तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत सरपंच विरोधातील अविश्वास ठराव संमत झाला. ९ पैकी १ सदस्य अनुपस्थित होता तर ८ पैकी ७ मते अविश्वास ठरावाच्या बाजूने पडली. त्यामुळे सरपंच दलवाई यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.
मिरजोळी ग्रामपंचायतीची निवडणूक अडीच वर्षापूर्वी झाली होती. कासम दलवाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व मिळवले होते. त्या वेळी एकही विरोधी सदस्य विजयी झाला नव्हता. दरम्यान, सुरवातीस सरपंच म्हणून कासम दलवाई यांना सरपंचपदाची संधी मिळाली. यापूर्वीही त्यांनी सरपंच म्हणून कामकाज पाहिले होते. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर काही महिन्यांनी सदस्यांच्या अंतर्गत तक्रारी सुरू झाल्या. गावातील घनकचरा प्रकल्पावरूनही राजकारण पेटले होते.
सरपंच दलवाई विश्वासात न घेताच काम करतात. ग्रामपंचायतीत त्यांच्याकडून मनमानी कारभार सुरू आहे. त्यासाठी २८ फेब्रुवारी २०२२ ला सदस्यांनी सरपंच दलवाई यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला; मात्र निर्धारित कालावधीत हा प्रस्ताव दाखल करता येत नसल्याने अविश्वास फेटाळण्यात आला.
दरम्यान अलिकडेच सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंचाना लेखी नोटिसा देत तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी अविश्वास प्रस्तावाबाबत विशेष सभा घेतली. सरपंच मनमानी कारभार करतात. गावात झालेल्या विकासकामांची देयके अदा करत नसल्याच्या तक्रारीही केल्या तर सरपंच कासम दलवाई म्हणाले, ‘ केवळ दबावापोटी सदस्य विरोधात तक्रारी करत आहेत.’
शेवटी अविश्वास ठरावाविरोधात मतदान घेण्यात आले. हात उंचावून झालेल्या मतदानात ८ विरुद्ध ७ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. परिणामी, सरपंच दलवाई यांच्या विरोधातील अविश्वास संमत करण्यात आला.

कोट
सदस्यांनी काहींच्या दबावापोटी गतवर्षी २८ फेब्रुवारी २०२२ ला आपल्या विरोधात तहसीलदारांकडे अविश्वास दाखल केला होता. वर्षभरात अविश्वास आणता येत नसल्याने तो फेटाळण्यात आला. अविश्वास फेटाळल्यानंतर वर्षभर पुन्हा अविश्वास ठराव आणता येत नाही. वर्षाचा कालावधी होण्यास दहा दिवसाचा अवधी बाकी असतानाच अविश्वासासाठी विशेष सभा घेत ठराव संमत केला. त्यामुळे हा ठरावच नियमबाह्य आहे.
- कासम दलवाई, सरपंच मिरजोळी