रत्नागिरी-क्राईम

रत्नागिरी-क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचार
आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत तिचे लैगिक शोषण करणाऱ्या आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाने ७ वर्षे सश्रम कारावास व २७ हजार दंडाची शिक्षा ठोठावली.
गंधार साळवी (वय ३१, रा. मांडवी, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २० जुलै २०१७ ते जुलै २०१९ या दोन वर्षांच्या कालावधीत घडली होती. या प्रकरणी पीडितेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपी गंधार याने पीडिता ही अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिच्याशी मैत्री केली होती. ते दोघं फिरायला जात होते. तेव्हा गंधारने पीडितेला मित्राच्या फ्लॅटवर नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध केले होते. ७ जुलै २०१९ ला आरोपीने गाडीमध्ये पीडितेशी शरीरसंबंध करून तू अजून वयाने लहान असल्याने मी लग्नाला नकार देत असल्याचे तिला सांगितले. त्यानंतर पीडितेने याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६, ५०६ आणि पोक्सो कायद्यांतर्गत ३, ४, ७, ८ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक डी. डी. मुसळे आणि लक्ष्मी सूर्यवंशी यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मंगळवारी या खटल्याचा निकाल विशेष पॉक्सो न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे विशेष पॉक्सो न्यायालय अभियोक्ता अ‍ॅड. मेघना नलावडे यांनी १७ साक्षीदार तपासले. न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला भादंवि कलम ३७६ मध्ये ७ वर्ष शिक्षा १० हजार रुपये दंड, भादंवि कलम ५०६ मध्ये २ महिने शिक्षा २ हजार रुपये दंड, पोक्सो कायद्यांतर्गत ३, ४, मध्ये ७ वर्ष शिक्षा आणि १० हजार दंड तसेच ८ मध्ये ३ वर्ष शिक्षा ५ हजार दंड अशी एकूण ७ वर्ष सश्रम कारावास आणि २७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल सोनाली शिंदे यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com