
कणकवली : दारू जप्त
kan215.jpg
कणकवली ः ओसरगाव येथे गोवा बनावटीच्या दारूसह टेम्पो पोलिसांनी जप्त केला.
-----------
ओसरगाव येथे 70 हजाराची गोवाबनवटीची दारू जप्त
वाहतुक पोलीसांची कारवाई ः संशयीतासह टेम्पो जप्त
कणकवली,ता.14 ः गोव येथून चिपळूण येथे गोवा बनावटीची 70 हजाराची दारू वाहतुक करण्याचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे. ही कारावाई आज दहा वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील ओसरगार टोल नाक्यावर वाहतुक पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी 3 लाख 50 हजाराचा टेम्पोसह संशय़ीतांस ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी चालक गणेश गजानन काळसेकर ( वय 24, रा. निरवडे, झरबाजार, ता. सावंतवाडी) याला ताब्यात घेण्यात आले. आहे.
या प्रकरणी येथील पोलिसात सुमित सिताराम चव्हाण (वय 33) यांनी फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास चहा पिण्यासाठी महामार्ग पोलीस मदत केंद्र कार्यालय येथून गोवा ते मुंबई जाणारे महामार्ग क्र.66 वर ओसरगांव टोलनाक्यावर जात होते. गोवा ते मुंबई जाणार लेनवर एक टॅम्पो (क्र. एम एच 08 एपी 1609) हा धोकादायक रित्या चालवित येत असल्याचे दिसुन आले. त्या टेम्पोला थांबविले व त्यावरील चालकास खाली उतरवून वाहनाचे कागदपत्र व वाहन चालविण्याचा परवाना मागीतला असता कागदपत्र नसल्याबाबत त्यांने सांगितले. त्यानंतर वाहनात काय आहे याची खात्री करण्यासाठी वाहनाचा मागील बंद होदा चालकास दाखविण्यास सांगितले. टेम्पोच्या मागील बंद हौदा चालकास दाखविण्यास सांगितले असता टेम्पोंच्या आतून चोरटा कप्पा असल्याचे लक्षात आले. तपासणी करता त्यामध्ये गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारूचे बॉक्स दिसून आले. यात गोवा बनावटीचे दारूचे 56 बॉक्स 5 सुटया दारुच्या बाटल्या असा 70 हजाराच माल होता. या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----
सावंत