
आयएससी मालेगाव विजेता
swt२१३२.jpg
८४४७६
उंबर्डेः विजेत्या संघाला भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांच्या हस्ते चषक देण्यात आला.
आयएससी मालेगाव विजेता
उंबर्डेतील शूटिंगबॉल स्पर्धाः पंजाब उपविजेता, क्रीडारसिकांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २१ ः उंबर्डे येथील ग्रामसेवा क्रीडा मंडळ आयोजित राष्ट्रीय शूटिंगबॉल स्पर्धेत आयएससी मालेगाव संघ विजेता, तर पंजाब संघ उपविजेता ठरला. प्रकाशझोतात खेळविण्यात आलेली ही स्पर्धा पाहण्यासाठी हजारो क्रीडा रसिकांची गर्दी झाली होती.
ग्रामसेवा क्रीडा मंडळाच्यावतीने उंबर्डे येथे राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले. त्यामध्ये राज्याबाहेरील सहा संघांचा समावेश होता. प्रकाशझोतात खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेला क्रीडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती. अंतिम सामना आयएससी मालेगाव आणि पंजाब संघामध्ये झाला. अटीतटीच्या लढतीत मालेगाव संघाने पंजाब संघाचा पराभव केला. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी देखील इस्तियाक मालेगाव आणि फुर्शीद मालेगाव या दोन संघांमध्ये चुरशीची लढत झाली. यामध्ये इस्तियाक मालेगाव तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. तर फुर्शीद मालेगाव संघाला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत उत्कृष्ट खेळी करणाऱ्या मालेगावच्या वकार या खेळाडूला उत्कृष्ट शूटर, पंजाबच्या गुरुपियारला बेस्ट लिफ्टर, तर मालेगावच्या इंजमाम अन्सारीला बेस्ट नेटमन म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ३५ हजार व चषक, व्दितीय क्रमांकास ३० हजार व चषक, तृतीय क्रमांकास २० हजार व चषक, तर चतुर्थ क्रमांकास १५ हजार रुपये व चषक अशी बक्षिसे मान्यवरांचे हस्ते देण्यात आली. बक्षीस वितरण सोहळ्यास भाजपाचे तालुकाध्यक्ष नासीर काझी, अरविंद रावराणे, हुसेन लांजेकर, भालचंद्र साठे, संजय कदम, एस. एम. बोबडे, दशरथ दळवी, डॉ. विजय पांचाळ, सचिन दळवी, जगदीश मोपरेकर, महेश रावराणे, संजय महाडीक आदी उपस्थित होते.