रत्नागिरी-तीन रुग्णवाहिका चालकांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-तीन रुग्णवाहिका चालकांचा सन्मान
रत्नागिरी-तीन रुग्णवाहिका चालकांचा सन्मान

रत्नागिरी-तीन रुग्णवाहिका चालकांचा सन्मान

sakal_logo
By

-rat२१p३१.jpg -KOP२३L८४३३४
रत्नागिरी ः जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकांच्या चालकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कार करण्यात आलेले चालकांसोबत अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, राजन बोडेकर आदी.


तीन रुग्णवाहिका चालकांचा सन्मान

नरेंद्राचार्य महाराज संस्थान माध्यमातून उल्लेखनीय कार्य ; जखमींना तातडीची मदत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व रत्नागिरी जिल्हा पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ३४वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियनांतर्गत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या तीन रुग्णवाहिका चालकांचा सत्कार करण्यात आला.
डॉक्टर, नर्स, पोलिस यांसह अत्यावश्यक सेवेतील सर्व योद्धे आपली सेवा बजावत असतात. यातील महत्वाचा घटक म्हणजे रुग्णवाहिका अर्थात रुग्णवाहिकेचे चालक. गेल्या अनेक वर्षभरापासून जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिका चालक आपलं कर्तव्य चोख बजावत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर कोणत्याही ठिकाणी अपघात झाल्यावर संस्थान रुग्णवाहिका चालकांना फोन केल्यावर काही सेकंदात नरेंद्राचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिका दाखल होते. जखमी रुग्णांना अगदी व्यवस्थितरित्या हाताळून रुग्णालयापर्यंत आणणे हे महत्वाचे काम रुग्णवाहिकेचे चालक करत असतात. हातखंबा भागात अनेक अपघात होत असतात. या ठिकाणी शासनाची १०८ रुग्णवाहिका पोचण्यास कायम विलंब होत असतो; मात्र संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक धनेश (बाळू) केतकर यांना कॉल केल्यावर काही सेकंदात रुग्णवाहिका घेऊन अपघातस्थळी दाखल होतात. आजपर्यंत या रुग्णवाहिका देवदुताप्रमाणे मदतीसाठी धावून आल्या आहेत तसेच अनेक रुग्णांचे प्राणदेखील चालकांनी वाचवले आहेत. या चालकांची कार्यतत्परता कायम वाखाणण्यासारखीच आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव ३४वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियनांतर्गत रत्नागिरी पोलिस प्रशासनाने केला आहे. नरेंद्राचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेचे चालक धनेश केतकर (हातखंबा), गुरूनाथ नागवेकर (संगमेश्वर), मुकुंद मोरे (कशेडी) यांना अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.