
पुष्पसेन सावंत यांना डिगसमध्ये अभिवादन
84540
डिगस ः संदीप राठोड यांना कृषिमित्र पुरस्कार प्रदान करताना अमरसेन सावंत, नागेंद्र परब, संजय पडते, अतुल बंगे आदी.
पुष्पसेन सावंत यांना डिगसमध्ये अभिवादन
तृतीय स्मृतिदिन; विविध स्पर्धांतील विद्यार्थ्यांचा गौरव
कुडाळ, ता. २२ ः श्री कालिका प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ, डिगस संचलित माध्यमिक विद्यालय, डिगस येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार पुष्पसेन (नाना) सावंत यांचा तृतीय स्मृतिदिन काल (ता. २१) साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पसेन सावंत यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण केली.
माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी संस्थाध्यक्ष तथा उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, जिल्हा परिषद माजी गटनेते नागेंद्र परब, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी पंचायत सदस्य अतुल बंगे, माजी उपसभापती जयभारत पालव, डिगस सरपंच पूनम पवार, संस्था उपाध्यक्ष विठ्ठल पवार, संचालक रामचंद्र घोगळे, संजय तावडे, मोहन गावडे, मुख्याध्यापक दीपक आळवे, उपसरपंच मनोज पाताडे, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सोसायटी सेक्रेटरी दीपक चेऊलकर, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर, प्रगतशील शेतकरी संदीप राठोड, युवासेना शाखाप्रमुख रुपेश पवार, बाळा राणे, अनुजा सावंत, अनुपसेन सावंत, कुडाळचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, ओबीसी सेल शहरप्रमुख राजू गवंडे, उदय धावले, गुरुनाथ पवार, नाथा राणे, मंदार कोठावळे, दशरथ गोसावी, ग्रामपंचायत सदस्या स्नेहा चव्हाण, राजश्री गुरव, साक्षी सावंत, सौ. भांबाळे, मेस्त्री, बबन चव्हाण, शिक्षक राणे आदी उपस्थित होते.
---
पुरस्काराचे वितरण
विद्यार्थ्यांतर्फे हरिषा पवार, मानसी सावंत, साक्षी सावंत, विश्वास आंगणे, अनुष्का पवार यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेतर्फे देण्यात येणारा माजी आमदार पुष्पसेन सावंत स्मृती ‘कृषिमित्र’ पुरस्कार डिगस येथील प्रगतशील शेतकरी संदीप राठोड यांना देण्यात आला. यावेळी विविध स्पर्धांमधील विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले. मुख्याध्यापक दीपक आळवे यांनी प्रास्ताविक केले. अनुजा सावंत यांनी सूत्रसंचालन केले. एस. पी. प्रभाळे यांनी आभार मानले.