
मातृभाषेचे संवर्धन करणे आवश्यक
84544
कुडाळ ः जागतिक मातृभाषा दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. व्ही. बी. झोडगे.
मातृभाषेचे संवर्धन करणे आवश्यक
डॉ. झोडगे ः राऊळ महाविद्यालयात जागतिक मातृभाषा दिन
कुडाळ, ता. २२ ः मातृभाषा ही आपली ओळख असून तिचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन येथील संत राऊळ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. बी. झोडगे यांनी केले.
येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे जागतिक मातृभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. झोडगे होते. या कार्यक्रमामध्ये मराठी विभागाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष बी.ए.च्या मराठीच्या विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून सादरीकरण केले. राजस्थानी, मारवाडी, बंगाली, उर्दू, हिंदी, मालवणी, कोकणी, सातारी, पुणेरी अशा मातृभाषा आणि मायबोलींमधून विद्यार्थ्यांनी लोककथा, लोकगीते, काही प्रसंग, आठवणी यांचे सादरीकरण केले. या सर्वांचा अनुवाद मराठी मातृभाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी करून जागतिक मातृभाषा दिन खऱ्या अर्थाने साजरा केला. प्रास्ताविकात डॉ. आसोलकर यांनी मातृभाषेचे महत्त्व सांगितले. मातृभाषा जपून तिचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी मातृभाषेमध्ये लिहिणे, बोलणे, व्यवहार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. इतिहास विभाग प्रमुख डॉ. व्ही. जी. भास्कर यांनी विचार मांडले. या कार्यक्रमांमध्ये लक्ष्मी राठोड, चेतना राठोड, गंधाली हडकर, रसिका म्हापसेकर, मानसी भागवत, सुवर्णा देसाई, ऋतुजा परुळेकर, ऋग्वेदा पराडकर, गणेश सालमटप्पे, हार्दिक कदम, प्रचिती सोनवडेकर यांनी सादरीकरण केले. मराठी विभाग प्रमुख डॉ. शरयू आसोलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत केले. प्रा. संतोष वालावलकर यांनी आभार मानले.