सोनुर्ली विद्यालयात भरली ‘विज्ञान जत्रा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनुर्ली विद्यालयात भरली ‘विज्ञान जत्रा’
सोनुर्ली विद्यालयात भरली ‘विज्ञान जत्रा’

सोनुर्ली विद्यालयात भरली ‘विज्ञान जत्रा’

sakal_logo
By

84538
सोनुर्ली : येथील हायस्कूलमध्ये विज्ञान जत्रा कार्यक्रमात माता-पिता पाद्यपूजा करताना विद्यार्थी.

सोनुर्ली विद्यालयात भरली ‘विज्ञान जत्रा’

पाद्यपूजा सोहळ्याने रंगत; विविध वैज्ञानिक उपक्रम लक्षवेधी

सावंतवाडी, ता. २२ ः श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ, सोनुर्ली संस्थेच्या माऊली माध्यमिक विद्यालयात ‘सायन्स फेअर’ (विज्ञान जत्रा) कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी भारतीय संस्कृतीचे महात्म्य सांगणारा माता-पिता पाद्यपूजा करून केलेला पालकांचा सन्मान कौतुकास पात्र ठरला.
व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अनंत परब, सचिव तथा शालेय समिती अध्यक्ष नागेश गावकर, सहसचिव गोविंद धडाम, बापू मोर्ये, शरद धाऊसकर, आनंद नाईक, राजेंद्र उर्फ बाळा गावकर, माऊली देवस्थान प्रमुख राजेंद्र गावकर, मळगाव केंद्र प्रमुख शिवाजी गावित, मळेवाड केंद्र प्रमुख म. ल. देसाई, माडखोल केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर, इन्सुली केंद्र प्रमुख लक्ष्मीदास ठाकूर, आरोस केंद्र प्रमुख कमलाकर ठाकूर, सोनुर्ली शाळा मुख्याध्यापिका राणे, पेंडूर शाळा मुख्याध्यापिका देवयानी आजगावकर, न्हावेली शाळा मुख्याध्यापिका स्मिता नाईक, मळेवाड शाळा मुख्याध्यापक लवू सातार्डेकर, शिक्षक संघटना नेते त्रिंबक आजगावकर, पर्यावरण स्नेही संस्था ‘नेफडो’च्या महिला जिल्हाध्यक्षा प्रा. पूजा गावडे, गोवा सायन्स सेंटरचे ट्रेनी रोहित निकम, वसुंधरा विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञ विभावरी पराडकर, स्टेम लर्निंगचे तज्ज्ञ गणेश लाड, सीसीआरटीचे जिल्हा समन्वयक अरुण तेरसे, एन. जे. गवंडळकर, संतोष वैज, मोहन पालयेकर, आरोंदा हायस्कूलचे सिद्धार्थ तांबे, बीआरसीच्या सारिका गावडे, सातार्डेकर, माडखोल मुख्याध्यापिका रश्मी सावंत, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष विकास जेठे, प्रयोग शाळा संघटनेचे संतोष ओटवणेकर, न्हावेली शाळेचे उपक्रमशील शिक्षक रावण आदी उपस्थित होते.
विद्यालयाचे राज्य पुरस्कार प्राप्त विज्ञान शिक्षक तथा सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पी. जी. काकतकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्याक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जी. एस. मोर्ये यांनी, सूत्रसंचालन प्रदीप सावंत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ, नवयुवक कला, क्रीडा मंडळ पाक्याचीवाडी, सोनुर्ली सहकारी सोसायटी, शब्दसखा मित्रमंडळ, शिक्षक-पालक संघ, माजी विद्यार्थी संघटना व सोनुर्ली, न्हावेली, निरवडे, पेंडूर येथील ग्रामस्थांचे विशेष सहकार्य मिळाले. पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची मोफत वाहतुकीची सोय संस्था संचालक आनंद नाईक यांनी केली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण गोवा सायन्स सेंटर, पणजी यांचे सायन्स ऑन व्हीलचे प्रयोग, स्टेम लर्निंग मुंबई यांचे कृतीयुक्त प्रयोग, वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरुरपार यांची फिरती प्रयोगशाळा, फिल्म शो, आकाश दर्शन, शालेय विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक रांगोळ्या, पर्यावरण संरक्षण पोस्टर प्रदर्शन, ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त ‘अनटोल्ड स्टोरीज ऑफ फ्रीडम फायटर’, असे विज्ञान विषयाशी संबधित विविधांगी उपक्रम ठरले. वैज्ञानिक वस्तूंचे प्रदर्शन सकाळी ११ ते ४ दरम्यान केले आहे. परिसरातील शाळांतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व विज्ञानप्रेमींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशालेचे विज्ञान शिक्षक काकतकर, मुख्याध्यापक मोर्ये यांनी केले आहे.