निवृत्तीवेतन वेळीच मिळावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवृत्तीवेतन वेळीच मिळावे
निवृत्तीवेतन वेळीच मिळावे

निवृत्तीवेतन वेळीच मिळावे

sakal_logo
By

निवृत्तीवेतन वेळीच मिळावे

सीईओंना निवेदन; निवृत्त शिक्षक संघटनेची मागणी

बांदा, ता. २२ ः जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवृत्त कर्मचारी आणि शिक्षक आदी निवृत्तांना सप्टेंबर २०२२ पासून निवृत्ती वेतन सरासरी दुसऱ्या महिन्याच्या ३० तारखेपर्यंत अदा केले जाते. यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना कार्यरत आहेत. नुकतीच निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवाभावी संस्था सावंतवाडीच्यावतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत लेखी निवेदन दिले. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर यांची भेट घेतली.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातून केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवृत्ती वेतनधारकांवर ही वेळ का यावी, असा प्रश्न उपस्थित होतो. देशात महाराष्ट्र सर्वच बाबतीत अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जात असताना सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन याला अपवाद का? हे निवेदन देईपर्यंत निवृत्ती वेतन बँकेमध्ये कदाचित जमाही झालेले असेल; परंतु म्हातारी मेल्याचे दुख: नाही, काळ सोकावू नये यासाठी प्रशासन प्रमुख म्हणून यावर निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे. कार्यक्षमता न अजमावता द्वितीय तसेच तृतीय श्रेणीतील अधिकारी पदोन्नतीने भरून प्रशासन त्यांच्या ताब्यात दिल्याने अशा समस्या निर्माण होण्यास तेच जबाबदार असून याची प्रशासन सेवेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना जाणीव असावी. जिल्हा प्रशासन भरकटलेल्या जहाजासारखे दिसत आहे. याला वेळीच आवर घालावा. निवृत्ती वेतन वेळीच मिळण्याची व्यवस्था करावी; अन्यथा याही पुढे असेच सुरू राहिल्यास लोकशाही मार्गाने लढा देऊ. याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही दिला. यावेळी संस्थाध्यक्ष मधुकर आईर, उपाध्यक्ष अरविंद नेमळेकर, सदस्य द. मा. गवस, महादेव बांदेकर आदी उपस्थित होते.