संक्षिप्त

संक्षिप्त

टुडे पान 2 साठी संक्षिप्त

84557
रिपब्लिकन पार्टीतर्फे कॅरम स्पर्धा
मंडणगड ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह मंडणगड येथे तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धा नगरसेवक आदेशभाऊ मर्चंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष नागसेन तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. आदेश मर्चंडे यांनी महाराजांच्या जीवनावर प्रबोधन केले. प्रशिक मर्चंडे यांनी शिवाजी महाराजांचे जीवन व कार्यावर मनोगत व्यक्त केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद पवार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सुमित साळवी व प्रदीप साळवी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. गौरव मर्चंडे व प्रशांत मर्चंडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव रामदास खैरे, विजय खैरे, किरण पवार, स्वप्नील धोत्रे, संदीप येलवे, संकेत तांबे, प्रथमेश खैरे आदींनी मेहनत घेतली.

84556
मुंडे महाविद्यालयात विद्यार्थी कार्यशाळा
मंडणगड ः लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विस्तार कार्य विभागातर्फे विस्तार द्वितीय सत्रातील कार्येशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्ञानदीप महाविद्यालयाचे क्षेत्र समन्वयक डॉ. उमेशकुमार बागल, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. राहुल जाधव उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर विस्तार विभागाचे समन्वयक डॉ. शामराव वाघमारे, प्रा. संदीप निर्वाण, ग्रंथपाल दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. वाघमारे यांनी प्रास्ताविकात कार्यशाळा आयोजित करण्याचा उद्देश व विस्तार विभागाच्या कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. बागल यांनी या विभागाचा मुख्य उद्देश सांगितला. त्यांनी महाविद्यालयाने स्विकारलेल्या करिअर प्रोजेक्ट आणि महिलांची समाजातील सद्यस्थिती या दोन प्रकल्पाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, समाजातील अनुचित प्रथा बंद करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गावपातळीवर प्रयत्न करावेत. समाजाकरिता या विभागाची कशी आवश्यकता आहे व असे कार्यक्रम कशा पद्धतीने राबवले पाहीजे.


84530
नॅशनल हायस्कूलमध्ये आरोग्य तपासणी
हर्णै ः प्राथमिक आरोग्य केंद्र आसूदअंतर्गत उपकेंद्र हर्णैतर्फे जागरूक पालक सुदृढ बालक या अभियानांतर्गत नॅशनल हायस्कूल व ह्युज ज्युनिअर कॉलेजमध्ये आरोग्य तपासणी पार पडली. या वेळी वैद्यकीय अधिकारी रंजनी कुराडे, समुदाय आरोग्य अधिकारी मोनाली नागपुरे, आरोग्यसेविका खेडेकर, आशासेविका विजया चव्हाण, प्रिया मुलुख, दीपाली कदम उपस्थित होते. शिक्षक कर्मचारी मुबिन बामणे, प्रशालेचे मुख्याध्यापक असिफ भाटकर, ह्युज ज्युनिअर कॉलेजचे प्रिन्सिपॉल नजीर इनामदार यांनी बहुमोल सहकार्य केले.


84558
ग्रामसेवक हातणकरांना जनमित्र पुरस्कार
राजापूर ः तालुक्यातील गोठणेदोनिवडे हातणकरवाडी गावचे सुपुत्र आणि कोंड्येतर्फ सौंदळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सचिन हातणकर यांना राजापूर-लांजा नागरिक संघातर्फे ‘नारायण तावडे जनमित्र पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. प्रशासकीय सेवेतून जनसामान्यांशी जोडलेल्या मैत्रीपूर्ण संबंध अन् त्यामधुन साधलेला गावविकास या त्यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला. तालुक्यातील तळवडे येथे राजापूर -लांजा नागरिक संघातर्फे झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनात त्यांचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सन्मानचित्र, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com