कब्बडी स्पर्धेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कब्बडी स्पर्धेचे आयोजन
कब्बडी स्पर्धेचे आयोजन

कब्बडी स्पर्धेचे आयोजन

sakal_logo
By

rat२२२१.txt

बातमी क्र..२१ ( पान २ साठी)

कोंडगाव येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

साखरपा ः भारतीय जनता पार्टी साखरपा आयोजित भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन कोंडगाव येथे करण्यात आले असून, या स्पर्धा उद्या(ता. २४) व शनिवारी (ता. २५) कोंडगाव तिठा येथे हॉटेल संकेतशेजारी होणार आहेत. स्पर्धा रंगतदार होणार असून क्रीडारसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ९ हजार ९९९ रु. व चषक, द्वितीय ७ हजार ७७७ रु. व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी आकर्षक चषक देण्यात येणार आहे. उत्कृष्ट चढाई व पकड यासाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी साखरपा यांनी सुबद्ध नियोजन केले आहे.
--

शिवजयंती सोहळा
देवरूख ः श्री देवी वाघजाई क्रीडामंडळ साडवलीतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शोभायात्रा, सह्याद्रीचा राजा शिवबा माझा यावर आधारित संगीतमय नाट्य, प्रा. डॉ. विनोद बाबर यांचे महाराजांवरील व्याख्यान, दुर्गवीर प्रतिष्ठान यांचा सन्मान व देणगी स्वरूपात मदत, भारतीय जवानांचा सत्कार, चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. शोभायात्रेचा आरंभ जि. प. अध्यक्ष रोहन बने व साडवली गावचे सरपंच व वाघजाई देवी क्रीडामंडळाचे अध्यक्ष राजू जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला. शोभायात्रेसाठी फुलांनी सजवलेला रथ हे विशेष आकर्षण होते. विद्यमान आमदार शेखर निकम, प्रद्युम्न माने हे देखील पायी चालत शोभायात्रेत सहभागी झाले.
---------

उद्धव ठाकरेंच्या गटात पक्षप्रवेशाचे वारे

दापोली ः केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या हाती दिले आहे. यानंतर उद्धव ठाकरे हे राजकीय वर्तुळात चांगलेच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम लवकरच मातोश्रीवर येऊन हाती शिवबंधन बांधणार असल्याची माहिती समोर येत आहे. संजय कदम हे दापोली-मंडणगड मतदार संघातील शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांचे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे कदम पिता-पुत्रांना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून ही खेळी खेळण्यात येत आहे. संजय कदम हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेमुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ निर्माण झाली. संजय कदम शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर संजय कदम यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश ५ मार्चला खेड येथील सभेत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कदम यांच्या पक्षप्रवेशाने कोकणात उद्धव ठाकरे यांची ताकद वाढणार असून, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यासाठी हे मोठे आव्हान मानले जात आहे.
--