श्री रत्नेश्वर मंदिर महाशिवरात्री उत्सवात

श्री रत्नेश्वर मंदिर महाशिवरात्री उत्सवात

rat२२२४. txt

बातमी क्र..२४ (पान ५ साठी)

rat२२p११.jpg ः
८४५२१
रत्नागिरी ः चवे येथील महाशिवरात्री उत्सवात वरचा मजला रिकामा या नाटकातील एक क्षण.

श्री रत्नेश्वर मंदिर महाशिवरात्र उत्सवात

वरचा मजला रिकामाने उडवली बहार

रत्नागिरी ः तालुक्यातील चवे येथील श्री रत्नेश्वर उत्सव मंडळ (मुंबई) कुलस्वामी देवस्थानचा महाशिवरात्री उत्सव उत्साहात झाला. सलग २८ वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवात तीन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाला चवे आणि मुंबईस्थित ग्रामस्थांना वर्णी लावली होती. शेवटच्या दिवशी झालेल्या श्री रत्नेश्वर नाट्यमंडळाच्या वरचा मजला रिकामा या नाटकाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. विनोदी ढंगाने जाणाऱ्या या नाटकाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी मंदिरात रूद्राभिषेक, आरत्या भोवत्या व रात्री हभप सायली मुळ्ये यांचे कीर्तन व रात्री नऊ वा. नमन झाले. दुसऱ्या दिवशी रूद्राभिषेक, लघुरूद्र, हळदीकुंकू, आरत्या,भोवत्या आणि हभप मुळ्ये यांचे कीर्तन झाले तर शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारी (ता. १९) सकाळी मंदिरात रूद्राभिषेक त्यानंतर रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यानंतर हभप मुळ्ये लळिताचे कीर्तन झाले. रात्री १० वा. आत्माराम सावंत लिखित वरचा मजला रिकामा हा नाट्यप्रयोग साकारण्यात आला. भाड्याचे घर मिळवण्यासाठी घरमालकाला मूर्ख बनवले जाते तर मालकाच्या मुलीला फसवून लग्न झालेला दिगंबर व नाना मामा काय काय शक्कल लढवतात. आक्रित झो व संगमेश्वरी साज फेम सचिन काळे व दीपेश काळे आणि अभिषेक काळे यांनी या नाटकात उत्तम अभिनय साकार केला. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. या नाटकाचे दिग्दर्शन चंद्रशेखर मुळ्ये यांनी केले. या नाटकात दिपेश काळे, सचिन काळे, अभिषेक काळे, सचिन काळे, संदीप जोशी, अस्मिता, श्रावणी भोसले, लोकेश सागवेकर तर साथसंगत, पार्श्वसंगीत दीपक काळे, रंगमंच व्यवस्था सुहास काळे, शिल्पा काळे तर ध्वनी संयोजन मधुकर लिंगायत यांनी संभाळली होती. या उत्सवाची सांगता लळिताच्या कीतर्नाने झाली.
---
rat२२p१०.jpg ः
८४५२०
रत्नागिरी ः कुवारबाव कट्टा कार्यक्रमात शिवजयंती उत्साहात साजरी झाली त्या वेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक.

कुवारबाव कट्टा काव्यवाचन, गायनाने रंगला

रत्नागिरी ः स्वरूपानंद ग्रंथालय-कुवारबांव परिसर या संस्थेच्या कुवारबाव कट्टा कार्यक्रमात शिवजयंती उत्साहात साजरी झाली. ज्येष्ठ नागरिक नानिवडेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. कोरोना कालवाधीपासून बंद पडलेला ''कुवारबाव कट्टा'' शिवजयंतीच्या शुभदिनी मोठ्या आनंदाने पुनश्च सुरू करण्यात आला. सर्वच स्तरातील कलाकारांसाठी हे एक मुक्त व्यासपीठ आहे. यापुढे सर्वांनी सहभाग घ्यावा, असे ग्रंथालयाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी सांगितले. विनायक हातखंबकर यांनी ग्रंथालयाच्या विविध उपक्रमांबाबत आढावा घेऊन सुरू होत असलेला हा साहित्यिक कुवारबाव कट्टा यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला. या वेळी गुरू नांदगावकर यांनी श्री गणेशाय धीमही या गीताने गणेशाला वंदन करून माझिया मना हे गीत सादर केले. शिवरायांच्या जाज्वल्य कर्तृत्वाचा इतिहास काव्यातून प्रवीण सावंतदेसाई यांनी जोशपूर्ण सादर करत अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती.. हे गीत सादर केले. संजय तांबे यांनी शिवरायांच्या जीवनावरिल कवितेसह दोन कविता.. प्रदीप मोरे यांनी गप्पा-टप्पा मध्ये संगीतामधील काही किस्से सांगितले. पांडुरंग नाईक यांनी राजे तुम्ही आणि आई मला वाचव ज्ञानेश पाटील यांनी वाट ही कविता, उमेश मोहिते यांनी लहान माझी ताई, नंदकुमार सावंत यांचे हिन्दी गीतगायन, शशिकांत राऊत यांची फुलू लागल्या भावना, विनायक हातखंबकर यांच्या चारोळ्या अशा विविध काव्यवाचन आणि गायनाने कुवारबाव कट्टा फुलला.
-------------

नवनिर्माण हायमध्ये दहावी व बारावीच्या बैठक व्यवस्था

रत्नागिरी ः सीबीएससी दिल्ली बोर्ड माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र लेखी परीक्षा येत्या २४ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, त्या ३१ मार्चपर्यंत चालणार आहेत. ही परीक्षा नवनिर्माण हाय एस. एम. जोशी विद्यानिकेतन, मिरजोळे, एमआयडीसी या शाळेत होणार असून परीक्षा केंद्राचे हे सातवे वर्ष आहे. परीक्षेसाठी नवनिर्माण हायस्कूल, मानेज् इंटरनॅशनल हायस्कूल, जिंदाल विद्यामंदिर, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, एस. व्ही .एम स्कूल, पी. एस. बने देवरूख या शाळेतील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. २४ फेब्रुवारीला पहिला पेपर दहावी-मराठी विषयाचा असून, बारावी इंग्रजी या विषयाचा आहे. सर्व शाळा मिळून एकूण दहावीचे १६१ विद्यार्थी व बारावीचे २५ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. विद्यार्थ्यांना बैठक व्यवस्था गुरुवारी (ता. २३) फेब्रुवारीला दुपारी चार ते पाच या वेळेत पाहावयास मिळेल. परीक्षेवेळी विद्यार्थ्यांनी केंद्रावर सकाळी ९.१५ ते ९.२० वाजेपर्यंत उपस्थित राहणे आवश्यक आहे. बोर्डाच्या नियमानुसार दहानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला आत प्रवेश देण्यात येणार नाही. संबंधित पालक व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.
--

rat२२p१९ ः
८४५३३
गावतळे ः आमदार योगेश कदम यांच्या हस्ते गजानन सामाले हे सहकुटुंब पुरस्कार स्वीकारताना.

गजानन सामाले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

गावतळे ः दापोली तालुका कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळाच्या शिवजयंती उत्सव आणि अधिकारी व कर्मचारी यांचा स्नेहमेळावा गटविकास अधिकारी आर. एम. दिघे यांच्या अध्यक्षतेखाली १९ फेब्रुवारीला रसिकरंजन नाट्यमंदिर दापोली येथे पार पडला. यामध्ये तालुक्यातील कुडावळे भोईद या आदिवासी शाळेत ज्ञानदान करत असलेले गजानन सामाले यांना आमदार योगेश कदम यांच्या हस्ते आदर्श शिक्षक हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ज्या शाळेत मुलांपेक्षा गुरेच जास्त वावर करायचीत अशा शाळेत शुन्यातून विश्व निर्माण करावे तसे गजानन सामाले यांनी आमुलाग्र बदल केलेला आहे. त्यांचे शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी गळती शून्यावर असून शाळेला सुट्टी असेल तरीही मुले शाळेतच असतात. म्हणजेच गुरांच्या गोठ्याचे रूपांतर त्यांनी आदर्श शाळेत केलेले आहे. या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, विस्तार अधिकारी सुनील सावंत, केंद्रप्रमुख धनंजय शिरसाट आणि शीतल गिम्हवणेकर यांचे मार्गदर्शन तर गूंज फाउंडेशन आणि सर्व पालक यांचे सहकार्य लाभल्याचे गजानन सामाले यांनी सांगितले. सामाले हे इंग्रजी विषयात निपूण असून, आत्तापर्यंत त्यांनी अनेकवेळा शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून काम केले आहे तर ऑनलाइन कामात केंद्रासह तालुक्याच्या सर्व कार्यात तंत्रस्नेही म्हणूनही कार्यभार सांभाळत असतात. सामालेंना मिळालेल्या पुरस्काराने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
-------

फोटो - ratchl२२३.jpg ः
८४५६३
चिपळूण ः गीतगायन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक.

शिशुविहार विभागात गीतगायन स्पर्धा

चिपळूण ः येथील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित शिशुविहार विभागात बुधवारी (ता. २२) गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना पाठांतराची सवय लागावी तसेच अभिनय व सभाधीटपणा वाढावा हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश होता. गाण्यामुळे विद्यार्थ्यांना ताल, लय व सूर यांचे ज्ञान होते. या स्पर्धेत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण अमिता चितळे व आदिती तांबे यांनी केले. या स्पर्धेत लहान गटात प्रथम मुद्रा शेवडे, द्वितीय आर्या पवार, तृतीय स्वरा सावंत. उत्तेजनार्थ म्हणून सिया राजापूरकर यांनी यश मिळवले. मोठ्या गटात प्रथम श्लोक रोकडे, द्वितीय सुरभी शेंबेकर, तृतीय अद्वैत खेडकर. उत्तेजनार्थ म्हणून श्रेया साने हिने यश मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या विभागप्रमुख मेधा जोशी, स्पर्धाप्रमुख सीमा आठल्ये, परीक्षक अमिता चितळे, आदिती तांबे आणि शिक्षकांनी कौतुक केले.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com