चिपळूण ः  आपल्यातील आत्मसात कौशल्ये ओळखायला शिका

चिपळूण ः आपल्यातील आत्मसात कौशल्ये ओळखायला शिका

पान २

८४५६०

आपल्यातील आत्मसात कौशल्ये ओळखायला शिका
प्रा. मोहन भिडे; करिअरच्या वाटा निवडताना तर्कशक्ती मोलाची
चिपळूण, ता. २२ ः दहावी-बारावीनंतर करिअरच्या संधी शोधताना अनेकदा विद्यार्थ्यांमध्ये गोंधळलेली परिस्थिती असते. आपल्या परिसरातील मित्र प्रवेश कोठे घेतात याकडे त्यांचा कटाक्ष असतो; मात्र विद्यार्थ्यांनी आजूबाजूच्यांचा विचार न करता आपल्यातील आत्मसात कौशल्ये ओळखायला शिकावीत. करिअरच्या वाटा निवडताना आपले वेगळे विचार आणि तर्कशक्ती खूप मोलाची आहे, असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मोहन भिडे यांनी केले.
शहरातील गोडबोले क्सासेस आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यशाळा ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात आयोजित केली होती. गोडबोले क्सासेसचे संचालक प्रा. अमेय गोडबोले यांनी कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला. या वेळी मार्गदर्शन करताना प्रा. मोहन भिडे म्हणाले, दहावी-बारावी नंतर करिअर निवडताना अनेकदा पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असते. करिअर म्हणजे चरितार्थाचे साधन. आपल्या आयुष्यात ३५ वर्षे ही जीवनमान उंचावण्याची व पैसे कमवण्याची आहेत. त्यासाठी अभ्यासपूर्वक विचार करून करिअर निवडण्यास प्राधान्य द्यावे. आपणास कोणत्या विषयात, शाखेत करिअर करायचे आहे त्याचा अगोदर अभ्यास करायला हवा. आपला मित्रपरिवार कोणत्या शाखेत प्रवेश घेतो, त्यानुसार आपणही तेथेच प्रवेश घ्यायला हवा, अशी कृती विद्यार्थ्यांनी टाळायला हवी. प्रामुख्याने करिअरच्या वाटा शोधताना आपल्यातील अंगभूत कौशल्ये ओळखायला शिकले पाहिजे. करिअरच्या ३० हजारहून अधिक संधी आहेत. आपल्यातील गुणवत्ता आणि क्षमताही खूप महत्वाच्या आहेत. इंजिनिअरिंगला प्रवेश घेताना गुणवत्ता आवश्यक आहेच शिवाय आपण किती तप्तरतेने विचार करू शकतो, आपले स्पेशल थिंकिंग आणि इमॅजिन पॉवरदेखील महत्वाची असल्याचे प्रा. भिडे यांनी स्पष्ट केले.
इंजिनिअरिंग व मेडिकलमध्ये कार्यरत नामांकित संस्थांची माहिती दिली. आयआयटी, नीट व जेईई मेनकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, यातून कोणते कोर्सेस करता येतील व त्यासाठी लागणारी गुणवत्ता व महाविद्यालयांची माहिती दिली. या वेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यशाळेला प्रा. अमेय गोडबोले यांच्यासह ब्राह्मणे, तांबे व गोडबोले क्सासेसचे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com