मदतनीसांचे मानधन 1,500 ने वाढले

मदतनीसांचे मानधन 1,500 ने वाढले

rat२२३३.TXT

बातमी क्र. ३३ ( पान ५ )

स्वयंपाकी, मदतनीसांचे मानधनात वाढ

शालेय पोषण आहार योजना ; ४ हजार ४१ जणांना लाभ

रत्नागिरी, ता. २३ ः शालेय पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वयंपाकी व मदतनीस यांच्या मानधनात तब्बल १ हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ४ हजार ४१ स्वयंपाकी व मदतनिसांना लाभ होणार आहे. १ एप्रिलपासून त्यांना २ हजार ५०० रुपये मानधन मिळणार आहे.
शालेय पोषण आहार ही केंद्रशासन पुरस्कृत योजना आहे. या योजनेमार्फत शाळांमधील विद्यार्थ्यांना आहार पुरवला जातो. यासाठी शाळांना निधीही देण्यात येत असतो. जिल्ह्यातील स्वयंपाकी व मदतनीस हे शाळांमधून पोषण आहार शिजवणे, आहार वाटप करणे, परिसर स्वच्छ करणे व इतर अनुषंगिक कामे करतात. पोषण आहार योजनेच्या प्रभावी पुढ अंमलबजावणीमध्ये विश स्वयंपाकी व मदतनीस यांचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ हजार ८८७ शाळांमधील ४ हजार ४१ स्वयंपाकी व मदतनीस कार्यरत आहेत. त्यांना केंद्र शासनाकडून ६०० रुपये व राज्य शासनाकडून ९०० रुपये असे मिळून १ हजार ५०० रुपये मानधन दरमहा मिळत होते. शेष हे मानधन दहा महिन्यांसाठी दिले जाते. त्यात वाढ करण्याची मागणी संघटनांनी वेळोवेळी शासनाकडे केली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील स्वयंपाकी व मदतनीस सुमारे पावणेदोन लाख विद्यार्थ्यांना दररोज शालेय पोषण आहार शिजवून देण्याचे काम करत आहेत. हे काम अतिशय जोखमीचे असल्याने स्वयंपाकी व मदतनीस यांना डोळ्यात तेल घालूनच भात शिजवावा लागत आहे. शासनाने १ एप्रिलपासून दीड हजार रुपये मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शालेय पोषण आहार शिजवून देणाऱ्‍या स्वयंपाकी व मदतनिसांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com