चिपळूण ः टॅलेंट मॅनिआ उपक्रम मनोबलासाठी आवश्यक

चिपळूण ः टॅलेंट मॅनिआ उपक्रम मनोबलासाठी आवश्यक

ratchl२२४.jpg
८४५७५
चिपळूणः विजेत्या विद्यार्थ्यांना गौरवताना संस्थेचे पदाधिकारी व प्राध्यापक.

मनोबलासाठी टॅलेंट मॅनिआ उपक्रम
प्रकाश जोशी; स्पर्धेत गुरूकुल कॉलेजची बाजी
चिपळूण, ता. २२ः आजच्या स्पर्धेच्या युगात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राला खूप चांगले दिवस आहेत. त्याकरिता विद्यार्थ्यांनी नेहमी सतर्क राहिले पाहिजे. टॅलेंट मॅनिआसारखे उपक्रम विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता व त्यांचे मनोबल वाढवण्याकरिता खूपच आवश्यक आहेत, असे प्रतिपादन नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रकाश जोशी यांनी व्यक्त केले. सर्व स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयाला देण्यात येणाऱ्या फिरत्या चषकावरती यावर्षी गुरूकुल कॉलेज चिपळूणची वर्णी लागली.
येथील डीबीजे महाविद्यालयात माहिती व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने टॅलेंट मॅनिआ २०२३ चे आयोजन केले होते. माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. सुनील भादुले यांनी स्पर्धेबाबतची संकल्पना मांडली. विभागाच्यावतीने राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील २००हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत प्रोजेक्ट प्रेझेंटेशनमध्ये एस. आर. एम. महाविद्यालयाच्या साईराज मोरजकर व राहुल प्रभुदेसाई यांनी प्रथम तर व्हीबीडीबीए महाविद्यालयाच्या अवधूत केळस्कर व गौरव जाधव, गुरूकुल महाविद्यालयाच्या यश पेडांमकर व प्रतीक्षा काटधरे यांच्यामध्ये द्वितीय क्रमांक विभागून तर डीबीजे महाविद्यालयाच्या प्रिती पालकर हिला तृतीय क्रमांक मिळाला.
पीपीटी स्पर्धेमध्ये डीबीजेच्या प्रणव गोडबोले व अमोघ चितळे यांनी प्रथम, गुरूकुलची फरिना कान्हेकर द्वितीय व गोगटे जोगळेकरच्या सिमरन मुकादम हिला तृतीय, व्हीबीडीबीए महाविद्यालयाच्या अंकिता गमरे व ऋषिकेष पवार, एसआरएम महाविद्यालयाच्या अब्दुसामी मुजावर यांना उत्तेजनार्थ. कोड मास्टर स्पर्धेत प्रथम धनेश भागवत, द्वितीय स्वरूप भिसे, तृतीय कौशिक मुसळे. ट्रेझर हंट या स्पर्धेत प्रथम स्वालिहा लोखंडे व रिशा खान, द्वितीय फरिना कान्हेकर व प्रतीक्षा काटधरे, तृतीय कौशिक मुसळे व ऋतिक बाणे.
ग्रुप डिस्कशन स्पर्धेत प्रथम साईराज मोरजकर व राहुल देसाई, द्वितीय आर्यन शिंदे व प्रसंशा टोपो, तृतीय रिबा देसाई व प्रतीक्षा काटधरे. बीजीएमआयमध्ये प्रथम आर्य आंबवकर, चैतन्य देवरूखकर, मोहम्मद बगदादी, सोहेल शहा या ग्रुपला, द्वितीय पारितोषिक शुभम माळवे, अनुप सावंत, ऋषिकेश पाटील व श्रवण सावंत या ग्रुपला तर तृतीय पारितोषिक मेघराज इंदुलकर, मनीष प्रजापती, अथर्व कदम व राज निकम या ग्रुपला मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com