
विद्यार्थ्यांनी मांडली व्यावसायिक बैठकीतील भूमिका
rat२२३५.txt
( पान २ )
फोटो - ratchl२२५.jpg ः
८४५९९
चिपळूण ः व्यावसायिक बैठकीतील भूमिका मांडताना विद्यार्थी.
वाणिज्य विद्यार्थ्यांकडून कॉर्पोरेट संस्कृतीचा अभ्यास
डीबीजे महाविद्यालय; अभ्यासक्रमात कंपनी कायदा २०१३
चिपळूण, ता. २२ ः येथील डीबीजे महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून व्यावसायिक बैठकीतील भूमिका ''कॉर्पोरेटचे राजे'' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.विद्यार्थी त्यांच्या पुढील जीवनात कॉर्पोरेट संस्कृतीचा अभ्यास करून त्यांच्या भविष्यात आणि वागणुकीत व्यावसायिकता आणतील अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.
द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात कंपनी कायदा २०१३ हा विषय अभ्यासाला असल्याने विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे. भविष्यात त्यांना कॉर्पोरेट सेक्टरमध्ये व्यावसायिक भूमिका बजावता याव्यात यासाठी वाणिज्य विभागाकडून प्रथमच हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संचालक मंडळातील अनेक संचालकांच्या भूमिकांचे सादरीकरण केले. विशेषतः अध्यक्ष, चिटणीस, प्रवर्तक, व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक, महिला संचालक, लेखापरीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी अशा विविध प्रमुख भूमिका बजावल्या. विद्यार्थ्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात वार्षिक सर्वसाधारण सभा कशी चालते. त्यामध्ये संचालक त्यांच्यावरील जबाबदाऱ्या कशा पार पाडतात यांचे प्रात्यक्षिक दिले. प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी कंपनीचे भागधारक म्हणून भूमिका बजावली. सभेची नोटीस, सभेत चर्चा करणाऱ्या गोष्टींची यादी, प्रत्यक्ष सभा, गणपूर्ती, मतदान, प्रस्ताव, ठराव, सभेत हरकत घेणे आणि सभेचा शेवट असे अनेक विषय सभेमध्ये प्रत्यक्षपणे घेतले गेले.
या सगळ्या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागप्रमुख रूचा खवणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अशा कार्यक्रमातून विद्यार्थी त्यांच्या पुढील जीवनात कॉर्पोरेट संस्कृतीचा अभ्यास करून त्यांच्या भविष्यात आणि वागणुकीत व्यावसायिकता आणतील, अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. माधव बापट, वाणिज्य विभागाच्या अर्चना घोले, नेहा तांबे यांचे सहकार्य मिळाले.
.