संक्षिप्त

संक्षिप्त

पान ३ साठी)


खेडमध्ये ''सह्याद्री''तर्फे प्लास्टिक कचरा गोळा
खेड ः शहरात माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत ''प्लास्टिक कचरा टाकू नका'' उपक्रम राबवण्यात येत आहे. यात चिपळूण सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेकडून १२७ किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. शहरातून आठवड्यातून बुधवार व शनिवार असे दोन दिवस सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेमार्फत प्लास्टिक कचरा वेगळा गोळा केला जाणार आहे घरातील प्लास्टिक कचरा पिशवीत साठवून ठेवण्याबाबत नागरिकांना सूचित करण्यात आले आहे. सह्याद्री निसर्ग संस्थेकडून प्रती ५ रुपये किलो दराने हा कचरा विकत घेतला जाणार आहे. या उपक्रमास व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण रेल्वेमार्गावर आणखी २ गाड्या विद्युत शक्तीवर
खेड ः कोकण रेल्वेमार्गावर आणखी २ रेल्वेगाड्या डिझेलऐवजी विद्युतशक्तीवर चालवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. यात तिरूनेलवेली-दादर साप्ताहिक एक्स्प्रेससह नियमितपणे धावणाऱ्या मंगळूर-मडगाव गाड्यांचा समावेश आहे. यामुळे विद्युत इंजिनावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या ३१ वर पोहचणार आहे. कोकण रेल्वेमार्गाचे संपूर्ण विद्युतीकरण झाल्यानंतर १५ सप्टेंबरपासून एकामागोमाग एक रेल्वेगाड्या विद्युतशक्तीवर धावत आहेत. आतापर्यंत २९ रेल्वेगाड्या विजेवर धावत होत्या. त्यात आणखी २ गाड्यांची भर पडणार आहे. २२६३०/२२६२९ क्रमांकाची तिरुनेलवेली- दादर साप्ताहिक एक्स्प्रेस २२ फेब्रुवारीपासून तर ०६६०२/०६६०१ क्रमांकाची मंगळूर-मडगाव नियमित गाडी ४ मार्चपासून डिझेलऐवजी विजेवर चालवण्यात येणार आहे. कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या हिसार-कोईमतूर साप्ताहिक एक्सप्रेसच्या थिविम थांब्याला पुढील सूचना मिळेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या एक्सप्रेस्ला थिविम थांब्याला मुदतवाढ देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती.


कबड्डीत झोलाई युवा विकास प्रतिष्ठान विजेता
खेड ः तालुक्यातील कांदोशी येथे रामवरदायिनी मित्रमंडळाने आयोजित केलेल्या कांदोशी चषक या कबड्डी स्पर्धेचा झोलाई युवा विकास प्रतिष्ठान आंबवली हा संघ विजेता व तर सह्याद्री फायटर्स किंजळे हा संघ उपविजेता ठरला. खेड तालुक्यातील कांदोशी हे दुर्गम गाव आहे. या गावात श्री रामवरदायिनी देवस्थानच्यावतीने रामवरदायिनी देवीच्या पालखीतील रूपं जीर्णोद्धार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने तब्बल ५० वर्षांनी कबड्डी स्पर्धेचे आयोजन रामवरदायिनी मित्रमंडळाच्या मार्गदर्शनाखाली आदित्य मोरे यांनी केले होते.
या स्पर्धेत तालुक्यातील अनेक संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेवेळी विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या वेळी अनेक खेळाडूंच्या विशेष कौशल्याचादेखील सन्मान आयोजकांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com