कणकवली : अपघात

कणकवली : अपघात

८४६६७

हुंबरठ येथे डंपर उलटून दोघे जखमी
कणकवली, ता. २२ ः भरधाव डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात डंपर रस्त्यावर उलटला. अपघातात दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात आज दुपारी चारच्या सुमारास महामार्गावर हुंबरठ पुलावर झाला. राजेश पाटकारे (वय २६, रा. कोळोशी, धनगरवाडी) आणि अरुण जाधव (वय १२, रा. सावडाव) अशी जखमींची नावे आहेत. राजेश पटकारे हे आपल्या ताब्यातील डंपर (एमएच ०७ एक्स १२००) घेऊन तळेरे ते हुंबरठ असे येत होते. त्या डंपरमध्ये माती भरलेली होती. महामार्गावर भरधाव वेगात वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. अपघातात चालकास किरकोळ दुखापत व सोबत असणाऱ्या मुलास किरकोळ अपघात झाला. डंपरचे किरकोळ नुकसान झाले असून, जखमी चालक व सहकारी यास कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com