लोटेत भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून चोरटे फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोटेत भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून चोरटे फरार
लोटेत भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून चोरटे फरार

लोटेत भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून चोरटे फरार

sakal_logo
By

rat२२२६.txt

बातमी क्र..२६ (पान ३ साठी)

महिलेचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेले

लोटेतील प्रकार ; पोलिसांची नाकाबंदी

खेड, ता. २२ ः तालुक्यातील लोटे या ठिकाणी उभ्या असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चारचाकी वाहनातून चोरट्यांनी पळ काढला. हा प्रकार शनिवारी (ता. १८) फेब्रुवारीला घडला. या प्रकारानंतर पोलिसांनी खेडमधील भरणेनाका, लोटे या ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गावर मोठा बंदोबस्त लावून नाकाबंदी केली. येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात होती.
लोटे येथे एक महिला रस्त्याशेजारी उभी होती. अचानक पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून काही लोक उतरले आणि तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेत मुंबईच्या दिशेने पळ काढला. काही क्षणात घडलेल्या या प्रकारामुळे महिलादेखील गांगरून गेली. या घटनेचा बोभाटा परिसरात झाल्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईच्या दिशेने असणाऱ्या खेडमधील भरणेनाका तसेच लोटे या ठिकाणी नाकाबंदी केली. येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी केली जात होती. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधला असता या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. अचानक घडलेल्या घटनेमुळे त्या महिलेला त्या वाहनाचा नंबर तसेच ओळख पटवता येईल, अशा प्रकारचे काहीही सांगता येत नव्हते; मात्र पांढऱ्या रंगाची मोटार असल्याचे पोलिसांना त्या महिलेने सांगितले असून त्यादृष्टीने पोलिसांचा कसून तपास सुरू झाला आहे.