एकाधिकारशाही चालू देणार नाही

एकाधिकारशाही चालू देणार नाही

84671
सावंतवाडी : पत्रकार परिषदेत बोलताना माजी नगराध्यक्ष संजू परब. बाजूला आनंद नेवगी, दिलीप भालेकर. (छायाचित्र ः रुपेश हिराप)


एकाधिकारशाही चालू देणार नाही

संजू परब ः भाजी मंडईबाबत केसरकरांवर टीका, विश्वासात घेऊन निर्णय घ्या

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः येथील भाजी मंडईबाबत मंत्री दीपक केसरकर यांची एकाधिकारशाही चालणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन मंडईबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. केसरकरांनी अलीकडेच घेतलेल्या बैठकीबाबत समाधानी नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे योग्य पुनर्वसन झाल्याशिवाय भूमिपूजन करू नये, अशी भूमिका माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे मांडली. आपल्या कार्यकाळात सुरू झालेली सेल्फी पॉईंट व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ही कामे रखडण्यास मुख्याधिकारी जबाबदार असून या संदर्भात पालकमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही परब म्हणाले.
परब यांनी आज येथील आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक आनंद नेवगी, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर आदी उपस्थित होते. परब म्हणाले, ‘‘राज्यात भाजप आणि शिंदे गट एकत्र काम करत असताना सावंतवाडी शहरात मंत्री केसरकर यांनी आम्हाला विश्वासात घेणे गरजेचे आहे; मात्र ते येथील भाजी मंडई संदर्भात एकाधिकारशाही चालवत आहेत. मी नगराध्यक्ष असताना भाजी मंडईचा आराखडा मंजूर झाला होता. त्यामुळे या संदर्भात बैठक घेताना केसरकरांनी आपल्यासह अन्य काहींना विश्वासात घेणे गरजेचे होते; मात्र तसे न करता त्यांनी बैठक घेऊन परस्पर निर्णय घेतले. त्यामुळे या बैठकीसंदर्भात आम्ही समाधानी नाही. व्यापाऱ्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे, यासाठी आग्रही आहे. त्यांचे योग्य पुनर्वसन करूनच भूमिपूजनाचा घाट घालावा. शहरातील रखडलेली कामे लक्षात घेता याला सर्वस्वी मुख्याधिकारीच जबाबदार आहेत. माझ्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तसेच सेल्फी पॉईंट ही कामे सुरू होऊनही अद्याप पूर्णत्वास आली नाहीत. बॅ. नाथ पै सभागृह नूतनीकरण काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. एकूणच याचा फटका नागरिकांना बसत असून त्याची खंत वाटते. या संदर्भात लवकरच पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार आहे.’’
----
सावंतवाडीसाठी ७ कोटी ३४ लाख
श्री. परब म्हणाले, ‘‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत सावंतवाडीतील विविध कामांसाठी ७ कोटी ३४ लाख रुपये मंजूर झाले आहेत. माझ्या कार्यकाळात या कामांचे ठराव मंजूर होते. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीयमंत्री नारायण राणे, मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर असून भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलींच्या सततच्या पुराव्यामुळे हे यश आले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्राच्या ठिकाणी सभागृह उभारणे, डोंगरे पाणंद येथे बहुउद्देशीय सभागृह उभारणे, बाहेरचा वाडा येथे बहुउद्देशीय सभागृह उभारणे, जिमखाना मैदान सपाटीकरण, डांबरीकरण आदी कामांचा यात समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com