कळसुलकर हायस्कूलमध्ये ''चिंतन दिन'' उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळसुलकर हायस्कूलमध्ये ''चिंतन दिन'' उत्साहात
कळसुलकर हायस्कूलमध्ये ''चिंतन दिन'' उत्साहात

कळसुलकर हायस्कूलमध्ये ''चिंतन दिन'' उत्साहात

sakal_logo
By

swt2310.pg
84754
सावंतवाडीः कळसुलकर हायस्कूलमध्ये लॉर्ड बेडन पॉवेल जयंती साजरी झाली.

कळसुलकर हायस्कूलमध्ये
''चिंतन दिन'' उत्साहात
सावंतवाडी ः लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या जयंतीनिमित्त येथील कळसुलकर हायस्कूलच्या स्काऊट-गाईड विद्यार्थी व शिक्षकांनी प्रशालेत चिंतन दिन साजरा केला. याप्रसंगी विविध शालेय स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसांनी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेच्या गाईड शिक्षिका जे. एस. पावसकर यांनी केले. सुरुवातीला लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांनतर स्काऊट गीत, झेंडा गीत गायन करण्यात आले. खरी कमाई केलेल्या विद्यार्थ्यांना देखील सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून हस्तकलेच्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. मुख्याध्यापक मानकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सई शेर्लेकर, सृष्टी गावडे यांनी केले.
...............
swt2311.jpg
84755
वेर्लेः येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी सरपंच रुचिता राऊळ, पी. एस. घाडगे आदी.

शासकीय योजनांबाबत
वेर्लेत शेतकऱ्यांना धडे
सावंतवाडीः महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत वेर्ले येथे शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती तसेच सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत गट यांत्रिकीकरण, अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका, पिक विमा, महाडीबीटी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड आदीविषयी मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी पी. एस. घाडगे यांनी केले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तृणधान्याचे आहारातील महत्त्व व गरज याविषयी माहिती कृषी सहाय्यक मिलिंद निकम यांनी दिली. शेतकरी मासिक, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा या योजनांविषयी तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बाजारपेठ मिळविण्याबाबत प्रोत्साहनपर मार्गदर्शन कृषी सहाय्यक स्वप्निल शिर्के यांनी केले. शेतकऱ्यांना शेतीविषयक योजनांची माहिती दिल्याबद्दल सरपंच रुचिता राऊळ यांनी आभार मानले. माजी सरपंच सुभाष राऊळ, ग्रामपंचायत सदस्य ममता राऊळ, चंद्रभागा गोसावी, मनीषा राऊळ, स्नेहा राऊळ, पल्लवी राणे, गोविंद लिंगवत, विजय राऊळ, संदीप सावंत, लाडजी राऊळ, दिलीप राऊळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सी. एल. राऊळ यांनी तर, आभार शंकर राऊळ यांनी मानले.