ओरोस भाजप मंडल सभेत विविध विषयांवर चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओरोस भाजप मंडल सभेत विविध विषयांवर चर्चा
ओरोस भाजप मंडल सभेत विविध विषयांवर चर्चा

ओरोस भाजप मंडल सभेत विविध विषयांवर चर्चा

sakal_logo
By

swt2312.jpg
84756
ओरोसः येथील भाजप मंडलाच्या मासिक सभेत मार्गदर्शन करताना दादा साईल.

ओरोस भाजप मंडल सभेत
विविध विषयांवर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २३ः भाजप, ओरोस मंडलाची मासिक सभा आज ओरोस येथील भाजप कार्यालयात तालुकाध्यक्ष दादा साईल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध कामे, योजना, विकास कामे मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन करण्यात आले. संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी उपस्थितांना याबाबत मार्गदर्शन केले.
या बैठकीमध्ये जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य म्हातु मानयेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर, महिला मोर्चा अध्यक्ष सुप्रिया वालावलकर, युवा मोर्चा अध्यक्ष पप्या तवटे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष विनोद कदम, सरचिटणीस नारायण गावडे, माजी पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण मडव, अरविंद परब, गोपाळ हरमलकर, अभय परब, युवा वारिअर्स जिल्हा समनव्यक अनंतराज पाटकर, मंडल उपाध्यक्ष नित्यानंद कांदळगावकर, चिटणीस प्रफुल्ल सावंत, संतोष वालावलकर, विजय उर्फ बाळा राणे, विभाग अध्यक्ष दिलीप तवटे, बापू पाताडे, शक्ती केंद्रप्रमुख नागेश परब, प्रशांत परब, दत्ताराम सावंत, सचिन तेली, उदय नारळीकर, महेश पालव, पांडू मालवणकर, वृणाल कुंभार, प्रशांत तावडे, विजय माळकर उपस्थित होते.