अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करा
अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करा

अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करा

sakal_logo
By

swt2316.jpg
84776
कुडाळः केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने केली.

अमित शहा यांच्यावर
गुन्हा दाखल करा
ठाकरे गटः कुडाळ पोलिसांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २३ः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौऱ्यात अपशब्द आणि शिवराळ भाषेचा वापर केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी उद्धव ठाकरे गट जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांच्या शिष्टमंडळाने कुडाळ पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन आज दुपारी कुडाळ पोलिस प्रशासनाकडे देण्यात आले.
अमित शहा यांच्या वक्तव्यामुळे राज्यात आणि देशात शांततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यांच्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनेला आणि श्रध्देला हानी पोहोचली आहे. त्यामुळे शहा यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही उद्धव ठाकरे गट शिष्टमंडळाने दिला. यावेळी तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपशहरप्रमुख गुरुनाथ गडकर, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, धीरेंद्र चव्हाण, संदीप महाडेश्वर, दीपक आंगणे, बाळा कोरगावकर, संदेश प्रभू, महेश सावंत आदी उपस्थित होते.