''आशा वर्कर्स''चे प्रश्न सोडविणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''आशा वर्कर्स''चे प्रश्न सोडविणार
''आशा वर्कर्स''चे प्रश्न सोडविणार

''आशा वर्कर्स''चे प्रश्न सोडविणार

sakal_logo
By

swt२३२१.jpg
84785
सिंधुदुर्गनगरीः जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांना मागण्यांचे निवेदन सादर करताना आशा व गटप्रवर्तक.

‘आशा वर्कर्स’चे प्रश्न सोडविणार
राजेंद्र पराडकरः प्रशासनास निवेदन सादर
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २३ः सिटु संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधत जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांना आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. पराड़कर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपले प्रश्न लवकर सोडवले जातील, असे आश्वासन दिले.
आशा व गटप्रवर्तक यांना दरवर्षी जून ते जुलैमध्ये दोन युनिफॉर्म खरेदी करण्यासाठी १२०० रुपये रक्कम दिली जाते. दरवर्षी १ डिसेंबरला आशा डे साजरा केला जातो व त्याचा भत्ता सुद्धा नियमित दिला जातो. उत्कृष्ट काम करणाऱ्या आशांना तालुका व जिल्हास्तरावर दरवर्षी पारितोषिके दिली जातात. त्यामुळे आशांनी केलेल्या कामाची प्रशंसा होऊन त्यांना आणखी काम करण्यास प्रेरणा मिळते. पण, यावर्षी आर्थिक वर्ष संपत आले तरीही एक युनिफॉर्मची रक्कम, आशा डेचा भत्ता व पारितोषिके अद्याप देण्यात आलेली नाहीत. यामुळे सर्व आशा व गटप्रवर्तकमध्ये नाराजीचा सूर पसरलेला असून त्याचा परिणाम त्यांच्या कामकाजावर होऊ शकतो. दरवर्षी मिळणारे अपघात विमा योजनेचे २० रूपये व जीवन विम्याचे ४३६ रूपये अद्याप खात्यावर जमा झालेले नाहीत. त्यामुळे सीटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने ३१ जानेवारी व १५ फेब्रुवारीला पत्र देऊन लवकरात लवकर मागण्यांची पूर्तता करण्यासाठी विनंती केली होती. तरीही सकारात्मक प्रतिसाद न आल्याने आम्हाला आमच्या व्यथा प्रशासनासमोर मांडाव्या लागल्या, असे अध्यक्ष प्रियांका तावडे, सचिव विजयाराणी पाटील, ममता वळंजु यांनी सांगितले.