श्रीमान दानशूर, भक्तीभूषण भागोजीशेठ कीर

श्रीमान दानशूर, भक्तीभूषण भागोजीशेठ कीर

rat२३१०.txt

बातमी क्र.१० ( टुडे जाहिरात पानासाठी)

फोटो-

rat२३p१९.jpg-
84802
रत्नागिरी- भागोजीशेठ कीर यांनी उभारलेली मंदिरे व संस्था.
---

कोणत्याही आर्किटेक्ट किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये भागोजींनी पदवी घेतली नव्हती; पण स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मुंबईकरांचा विश्वास आणि वाहवा मिळवली. भागोजीशेठ कीरांच्या सहकार्याने शापूरजी मेस्त्रींनी अनेक इमारती उभ्या केल्या. नाशिक सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस, लायन्स गार्डन, सेन्ट्रल बँक, बिल्डिंग, वाडिया बिल्डिंग, मफतलाल पार्क, ब्रेबॉर्न स्टेडियम, इंडियन मर्चंट चेंबर कावाराना बिल्डिंग, माधवजी धरमसी मिल्स, बॉम्बे सेंट्रल स्टेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, अॅम्बेसेडर हॉटेलची इमारत, ग्वाल्हेरच्या महाराजांचा बंगला यासारख्या असंख्य भव्य इमारती मुंबई आणि मुंबईबाहेर उभ्या केल्या. भागोजीशेठ नवनवीन इमारती उभ्या करून मुंबईची शान वाढवत होते. मरिन लाईन्स समुद्राचे आक्रमण रोखण्यासाठी त्यांनी उभारलेल्या काँक्रिट भिंतीमुळे त्यांचे नाव विशेष गाजले. दुर्दम्य आत्मविश्वास, चिकाटी, जिद्द आणि सर्वात महत्वाचे त्यांची सचोटी यामुळे व्यवसायात भरारी घेतली.अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या मुलाने घेतलेली ही भरारी थक्क करणारी आहे.आज त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ...

सुरेंद्र यशवंत घुडे
१४५७, घुडेवठार, दत्तमंदिरसमोर, विलणकरवाडी, रत्नागिरी.
मोबा. नं. ९४०४९९४४९८
---

श्रीमान दानशूर, भक्तीभूषण भागोजीशेठ कीर


श्रीमान दानशूर, भक्तीभूषण भागोजीशेठ कीर हे अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आले. आई-वडिलांच्या नावावर कर्ज होते. मुलांना खायला, प्यायला मिळताना अबाळ होती. भागोजींना मात्र याबाबत वाईट वाटत होते. शिक्षणाची आवड असून शिक्षण घेता येत नव्हते. आई-वडिलांना मदत करावी म्हणून सोनचाफ्याची फुले, उंडीच्या बिया विकून त्यातून मिळणारी रक्कम ते वडिलांकडे देत होते. सावकार फडकेंचा कर्ज फेडण्यासाठी सतत तगादा होता. त्यामुळे भागोजींना काहीतरी करून दाखण्याची जिद्द निर्माण झाली. मुंबईतून येणारा माणूस पाहिल्यानंतर तो सधन दिसत होता. ते पाहून भागोजींनी मुंबईला जाऊन करिअर करायचे ठरवले; पण मुंबईला जायला पैसे नव्हते. बोटीच्या तांडेलांकडे संगनमत करून त्यांनी मुंबई गाठली. एका सुताराच्या हाताखाली ते रंधा मारायचे काम करू लागले. येणारा पैसा ते रत्नागिरीत आई-वडिलांकडे पाठवू लागले तरी भागत नव्हते. मग भागोजींनी भुसा विकून त्यातून मिळणारी रक्कम आई-वडिलांना पाठवायला सुरवात केली. तरी पैसे कमी पडत होते. सावकार फडके यांनी कर्जाऊ रक्कम परत करावी म्हणून घरावर जप्ती आणली. त्यानंतर बाळोजी कीरांनी शेजारी, नातेवाइकांकडून उसनवार रक्कम घेऊन फडके सावकारांचे कर्ज फेडले.
मुंबईला भागोजींचा शहापूरजी पालनजी नावाच्या मेस्त्रींकडे संपर्क झाला. तिकडे त्यांनी सुतारकामाला सुरवात केली. पालनजींनी कष्टकरी मुलगा आहे हे पाहून आपल्याला याची चांगली मदत होईल म्हणून परीक्षा घेण्याचे ठरवले. लाकडाच्या भुशामध्ये नोटांचे बंडल मिसळले. भागोजी मुळातच प्रामाणिक असल्याने ते नोटांचे बंडल त्यांनी पालनजींना परत केले. पालनजींचा विश्वास बसला. त्यांनी भागोजींना आपल्या कामात सहभागी करून घेतले. भागोजी अतिकष्ट करू लागले, चांगला पैसा मिळवू लागले. खिशात दमडीही नसलेले भागोजी यांनी एक बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर होऊन महानगरीच्या जडणघडणीत मोलाची कामगिरी केली. परमेश्वराचे स्मरण केल्याशिवाय भागोजी अन्नग्रहण करत नव्हते. सोमवारी आणि महाशिवरात्रीला भागोजी कडक उपवास पाळत. ब्राह्मणपूजा करताना पाहून त्यांचे भान हरपे. आपण तशी पूजा करावी तर पिंडीला शिवू दिले जात नव्हते. कर्ता, करविता परमेश्वर आहे यावर भागोजींची गाढ श्रद्धा बनली. परमेश्वरकृपेने एक ना एक दिवस आपला भाग्योदय होईल, याची भागोजींना खात्री होती.
मुंबईसारख्या नगरीत हिंदू, शिख, मुसलमान, ख्रिश्चन, पारशीसारख्या अठरापगड जातीचे लोक खांद्याला खांदा लावून काम करत होते. भागोजींनी धाकट्या शंकरलाही मुंबईला बोलावले. आता चाराचे सहा हात झाले. पालनजी तिघांना मिळून कॉन्ट्रॅक्ट देऊ लागले. भागोजी कामे सफाईने करत. त्यामुळे पैसे मिळू लागले. भागोजींची आर्थिक परिस्थिती सुधारली. ते घरी पैसे पाठवू लागले. बाळोजींना आनंद होत होता. पेठकिल्ल्यातील सांबाच्या देवळाजवळील पेडणेकरांची मुलगी बाळोजींनी भागोजींसाठी हेरली, लग्न झाले. भागोजी पत्नी व दोन भावांसह मुंबईस परतले. पालनजी भागोजींवर खुष होते. त्यांच्यामुळे आपणाला यश मिळते म्हणून त्यांनी भागोजींना धंद्यात पार्टनर केल्यानंतर मुंबईतील नामांकित वास्तुशिल्प व बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर भागोजी झाले. लक्ष्मीबाईंना मूल होत नव्हते. मग सर्वांच्या अनुमतीने भागोजींनी दुसरे लग्न केले. धनाजी चवंडे यांची वारूणा उर्फ वाया या मुलीबरोबर लग्न झाले.

१९१९ ला भागोजींनी रत्नागिरीत जुन्या लाकडी भागेश्वर मंदिराचे नवे भव्य संपूर्ण चिरेबंदी बांधकाम १९२२ ला पूर्ण केले. १९३१ ला परमपुज्य गोभक्त चाँडे महाराजांच्या आज्ञेवरून बांधून दिलेल्या गोशाळेच्या कमानीवर ही गोशाळा स्व. पालनजी मिस्त्री यांच्या स्मरणार्थ भागोजीशेठ कीरांनी बांधली, असा स्पष्ट उल्लेख आढळतो. भागोजी यांनी १९२०नंतर केलेली लोकोपयोगी कामे भागेश्वर मंदिर, भागेश्वर धर्मशाळा, राम मारूतीमंदिर-किल्ला, पतित पावन मंदिर-रत्नागिरी, भागेश्वर धर्मशाळा वाई, भागेश्वर भुवन माहिम, भागेश्वर भुवन माटुंगा, अनंत भुवन क्र.१, अनंत भुवन क्र.२, भगवती मंदिर रत्नागिरी, ज्ञानमंदिर हॉल महिला विद्यालय रत्नागिरी ही सर्व कामे १९२० नंतरची आहेत. महाशिवरात्रीसाठी येणाऱ्या भक्तगणांसाठी भागोजींनी मंदिराच्या आवारात दुमजली इमारत बांधली. धर्मशाळा म्हणून त्याचा वापर होई. या इमारतीच्या शेजारी मंदिराला समांतर एक इमारत १९२४ ला बांधण्यात आली. हाच अनाथ विद्यार्थ्यांचा आश्रम आहे.

२२ फेब्रुवारी १९३१ ला पतितपावन मंदिराचे उद्घाटन झाले त्या दिवशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. अखिल भारतातील मोठे सहभोजन झाले. याचा सर्व खर्च भागोजींनी केला. त्यानंतर प्रत्येक वर्षी शेटजींच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९४४पर्यंत सहभोजने घडत होती. प्रतिवर्षी ४ हजाराच्या वर पान होई. बुंदीच्या लाडवांच्या राशीच्या राशी व तुपाचे घडे खाली होत. शेटजी स्वतः तूप वाढत, सर्व खर्च करत होते.
भागोजी शेठ वस्त्रदान, गरम ब्लॅंकेट दान करत. मुंबईला प्रतिवर्षी मकरसंक्रांतीच्या दिवशी फार मोठ्या प्रमाणात वस्त्रदान होई. १४ जानेवारीचा दिवस उजाडला की, भागोजी शेठ सर्व नोकरचाकरांना जमवत. त्यात महाराष्ट्रीयन, गुजराती, कामाठी, उत्तर भारतीय भय्येही असत. मेहता, मेस्त्री, सुपरवायझर यांना एक धोतर जोडी, दोन कोट, शर्टाचे कापड व टोपी दिली जाई. कामाठी बिगाऱ्यांना कुर्त्याचे कापड, धोतर व दोन साक्यांचे कापड देत. त्यांच्या बायकांना लुगड्यांची जोडी व खण देत. जवळजवळ ४०० ते ५०० माणसांना वस्त्रदान करण्यात येई. त्याचवेळी भागोजी माहिम येथील भागेश्वर भवनामध्ये राहत. तेथील रस्त्यावर शेकडो भिक्षुक जमत. त्यात हिंदू, साधू, बैरागी असत तसेच मुसलमान, फकिरही असत. त्या सर्वांना गरम ब्लॅंकेट वाटत असत.
माहिमला कीरशेटजी जेथे राहत तेथे त्यांच्याकडे दुभती जनावरे असायची. दूधदुभत्याला तोटा नसे. आजूबाजूच्या पोरांसाठी दूध आणि थोरांसाठी ताक मुफ्त दिले जायचे. कीरांच्या धर्मपत्नी भागिरथीबाई संक्रांतीला हळदीकुंकू करत. आजूबाजूच्या नात्यागोत्याच्या ओळखीपाळखीच्या झाडून साऱ्या सुवासिनी जमत. हळदीकुंकू समारंभाला खण, नारळ आणि भांडीकुंडी पुरवत. प्रत्येक सुवासिनींच्या संसारात प्रत्येक वर्षी एकेका भांड्याची भर पडे.
आपण स्वतः शिकलो नाही तरी आपले ज्ञाती बांधव शिकले पाहिजेत, असा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी किल्ल्यामध्ये व पेठकिल्ल्यामध्ये दोन मराठी शाळा सुरू केल्या. खव्याचे पेढे वाटून गणवेशासह शिक्षण फुकट देऊन गरीब भंडाऱ्यांच्या मुलांना शिक्षणाकडे वळवले. आज या संस्थातून नावारूपाला आलेले शेकडो विद्यार्थी भारतात व परदेशात मोठमोठ्या हुद्यावर काम करत आहेत.
आपली सर्व संपत्ती ही आपल्याला भागेश्वरकृपेने प्राप्त झाली म्हणून भागेश्वराच्या नावाने विविध समाजोपयोगी कामे करणे व ही समाजाकडून मिळालेली संपत्ती समाजास परत करणे असे या सर्व कार्यामागील शेटजींचे सोपे गणित होते. त्यासाठी त्यांनी १९२६ ला एक व्यक्तीनिष्ठ दान धर्मात्मक ट्रस्ट स्थापन केला. या ट्रस्टचे ते एकमेव विश्वस्त होते. पुढे त्यांना या धर्मकार्यामध्ये इतर मान्यवर लोकांचा समावेश करून घ्यावा असे वाटले. आपल्यामागे हा ट्रस्ट कार्यरत राहावा या दृष्टीने एक विस्तृत योजना बनवून व ती रजिस्टर्ड करून शेटजींनी १५ मे १९३० ला भागोजी बाळोजी कीर चॅरिटी स्ट्रस्टला मूर्त स्वरूप दिले. या ट्रस्टवर शेटजींनी आपल्यासोबत आपले भागीदार शापूरजी पालनजी मिस्त्री व जावई दत्तात्रय संभाजी पावसकर यांना मॅनेजिंग ट्रस्टचा दर्जा दिला. या ३ मॅनेजिंग ट्रस्टीजसह आणखी आठजणांची म्हणजे एकूण अकराजणांची मॅनेजिंग कमिटी स्विकृत करण्यात आली. त्यामध्ये बाबाजी अनाजी तारकर, गंगाराम शिवराम रावळ, विक्रमजी गोपाळजी मोरेश्वर गोविंदजी सावे, विष्णू कोंडाजी चव्हाण, भगवंत दत्तात्रय लोंढे, नारायण रामजी मालुसरे व शंकर बाळूजी कीर असे योजनेमध्ये स्पष्टपणे सूचित केले आहे. भागोजीशेठ कीरांच्या मृत्यूनंतर योजनेत बदल करण्याचा कोणालाही कोणताही अधिकार नाही, असे स्पष्टपणे योजनेत नमूद केले आहे.
भागोजी कीरांचा आदर्श घेऊन मा. श्री. महेंद्र मयेकर नगराध्यक्ष असताना सर्व प्राथमिक शाळांमधून २४ फेब्रुवारी भागोजीशेट कीर पुण्यतिथी साजरी होत आहे. त्यांच्या लोकोपयोगी कामांचा धडा मराठी पाठ्यपुस्तकात घेण्यात यावा म्हणून माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अनेक संस्थांमधून प्रस्ताव गेलेला असून मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत. भागोजीशेट कीरांना त्या वेळी त्यांच्या कामाबाबत गौरवण्यात येऊन त्यांना पुढीलप्रमाणे पदव्या दिलेल्या आहेत. कुलभूषण, भक्तीभूषण, शिक्षणमहर्षी कर्मवीर, दानशूर शेट, महामानव, वास्तू शिल्पकार, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, अस्पृश्योद्धारक अशाप्रकारे त्यांचा गौरव झालेला आहे.
--
ट्रस्टच्या उद्दिष्टांमध्ये भागेश्वर मंदिरातील पूजा, वार्षिक उत्सवसाठी खर्च करणे, प्रमुख उद्दिष्ट रत्नागिरी किल्ल्यावर बालकाश्रम सुरू करून भंडारी जातीतील मुलांना बौद्धिक, शिल्पकला व मुख्यता धंदे शिक्षण देणारी संस्था सुरू करण्याची इच्छा प्रकट केली आहे. विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्या देणे, आवश्यक तर परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देणे, असा आहे. भंडारी जातीतील निराश्रित मुलींची लग्न करणे, अनाथ हिंदूचे जातीनिरपेक्ष प्रेतसंस्कार करणे, अनाथ, लंगडे, खुळे अशा लोकांना अन्नदान करणे अशा कामांवर खर्च करावा, असे म्हटले आहे.शेटजींनी वरील सर्व कामांसाठी पैसा हाती यावा या हेतूने मुंबईमध्ये जमिनी खरेदी करून मोठ्या इमारती बांधलेल्या असून, त्या भाड्याने दिलेल्या आहेत. त्यामधून येणारा पैसा वरील कामांसाठी वापरण्याची तरतूद आहे. खोल्या भाड्यांनी देताना दलितांनाही झुकते माप दिले आहे. पतितपावन मंदिराचा दैनंदिन व नित्याचा खर्च परस्पर भागावा म्हणून शेटजींनी त्या कंपाउंडमध्ये चाळी बांधल्या. त्या भाड्याने दिल्यानंतर काही अंशी उत्पन्नाची सोय झाली.

संकलन
राजेश शेळके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com