गुहागर ः यावर्षी दोन कासवांना सॅटेलाईट ट्रान्समिटर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर ः यावर्षी दोन कासवांना सॅटेलाईट ट्रान्समिटर
गुहागर ः यावर्षी दोन कासवांना सॅटेलाईट ट्रान्समिटर

गुहागर ः यावर्षी दोन कासवांना सॅटेलाईट ट्रान्समिटर

sakal_logo
By

rat२३p१२.jpg ःKOP२३L८४७५२
गुहागर ः गुहागर किनारी कासवांना अशा प्रकारे टॅग लावण्यात आला.

सॅटेलाईट ट्रान्समिटर बंदमुळे
कासवांच्या अभ्यासात खो

डॉ. सुरेशकुमार ; ७०० दिवसांची क्षमता,वर्षभर सिग्नलची अपेक्षा
गुहागर, ता. २३ ः गेल्या वर्षी ५ कासवांना ट्रान्समिटर लावून समुद्रात सोडण्यात आले होते. त्यातून अपेक्षित माहिती मिळाली नाही त्यामुळे पुन्हा दोन कासवांधारे हा प्रयोग पुन्हा करण्यात आला.गेल्या वर्षी ५ कासवांना ट्रान्समिटर लावून समुद्रात सोडण्यात आले होते. हे ट्रान्समीटर मध्येच बंद पडले. त्यामुळे वर्षभराच्या प्रवासाची माहिती आपल्याकडे संकलित झालेली नाही. म्हणून यावर्षी पुन्हा दोन कासवांना सॅटेलाईट ट्रान्समिटर लावून समुद्रात सोडण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेशकुमार यांनी दिली.
गेल्या वर्षी आंजर्ले, वेळास येथील प्रत्येकी आणि गुहागरमधील ३ कासवांना सॅटेलाईट ट्रान्समिटर लावण्यात आला होता. या पाचही कासवांचा प्रवास गुजरात ते तामिळनाडूदरम्यान सुरू होता. सॅटेलाईट ट्रान्समिटरने काम बंद सिग्नल दिल्याने पूर्ण वर्षभराचा त्याचा प्रवास अभ्यासता आलेला नाही. एका ट्रान्समिटरची क्षमता ७०० दिवस काम करण्याची असते. त्यामुळे किमान वर्षभर ट्रान्समिटरकडून सिग्नल मिळावेत ही अपेक्षा असते; मात्र हे पाचही सॅटेलाईट ट्रान्समिटर त्यापूर्वीच काम करेनासे झाले. म्हणून पुन्हा एकदा दोन कासवांना सॅटेलाईट ट्रान्समिटर लावण्याचा प्रयोग गुहागरमध्ये करण्यात आला.
गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही दोन्ही कासवांचे नामकरण करण्यात आले. बाग समुद्र परिसरात मिळालेल्या कासवाचा बागेश्री तर गुहागरच्या समुद्रावर मिळालेल्या मादी कासवाला गुहा असे नाव देण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ट्रान्समिटर लावून या कासवांना समुद्रात सोडण्यात आले. संदेशवहनाबाबत बोलताना डॉ. सुरेशकुमार म्हणाले,‘कासवाच्या पाठीवर लावलेल्या उपकरणामध्ये दोन वर्ष चालेल एवढ्या क्षमतेची बॅटरी आहे. सॅटेलाईटच्या कक्षात हा ट्रान्समिटर आल्यानंतर कासवाच्या पाठीवरून संदेश अमेरिकेतील ओशोनिक ॲण्ड ॲटमोस्फिअरिक ऑर्गनायझेशन या संस्थेकडे जातो. तेथून तो आमच्यापर्यंत पोचतो. ही सर्व प्रक्रिया स्वयंचलित असते.

चौकट
मृत समुद्रामुळे कासवांच्या प्रवासावर मर्यादा
अरबी समुद्रामध्ये भारताची पश्चिम किनारपट्टी, पाकिस्तान, कतार, ओमान यांच्यामध्ये समुद्रात सर्वांत मोठा डेड झोन आहे. येथील ऑक्सिजनची पातळी अत्यंत कमी असल्याने पश्चिम किनारपट्टीवरील कासवे किनाऱ्यापासून खोल समुद्रात जात नाहीत. ती किनारपट्टीलगत उत्तर ते दक्षिण प्रवास करतात. त्यांचा हा प्रवास दक्षिणेकडे लक्षद्वीपपर्यंत येऊन थांबत असावा. त्यानंतर ही कासवे पुन्हा उत्तरेकडे प्रवास करत असावीत, असा अंदाज आहे. या प्रयोगानंतर त्याबाबत निश्चित बोलता येईल, अशी माहिती या वेळी डॉ. सुरेशकुमार यांनी दिली.