शिवजयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवजयंती
शिवजयंती

शिवजयंती

sakal_logo
By

rat२३११.txt

बातमी क्र.. ११ ( पान २ साठी संक्षिप्त)

rat२३p८.jpg ः
८४७४२
चिपळूण ः शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालय, खरवते दहिवलीमध्ये शिवजयंती कार्यक्रमावेळी आमदार शेखर निकम, संचालक मारूतीराव घाग, जयेंद्र खताते, माजी सभापती पूजाताई निकम.


गोविंदगडावरून विद्यार्थ्यांनी आणली शिवज्योत


चिपळूण ः सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालय, खरवते दहीवलीमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून गोविंदगडावरून शिवज्योत आणण्यात आली. यानंतर भव्यदिव्य मिरवणूक, गगनभेदी, घोषणा, उत्साहात रंगून गेलेला विद्यार्थीवर्ग यामुळे महाविद्यालयीन परिसर शिवमय झाला. या कार्यक्रमास चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती पूजाताई निकम, सह्याद्री शिक्षणसंस्थेचे ज्येष्ठ संचालक मारूतीराव घाग, राष्ट्रवादी काँग्रेस चिपळूण तालुकाध्यक्ष जयेंद्र खताते, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ज्योतीचे पूजन चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाचे आमदार व कार्यक्रमाचे प्रमुख शेखर निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे व मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पारंपरिक ढोलवादन, दांडपट्टा प्रात्यक्षिक, शिवचरित्र नाटिका, हलगी, गडकिल्ले प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा इ.चा समावेश होता.
-

खेड शहरात ३ आधार नोंदणी केंद्र बंद
खेड ः शहरातील चार आधार केंद्रांपैकी तीन आधार केंद्र बंद असल्याने तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या शेकडो ग्रामस्थांची ससेहोलपट होत असून मोठी गैरसोय होऊ लागली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राजकीय दबावांना बळी पडत शहरातील आधार केंद्र बंद केल्यामुळे सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. खेड तालुक्यात ७ केंद्र आहेत. त्यापैकी शहरात ४ आधार नोंदणी केंद्र आहे. मध्यंतरीच्या कालावधीत काही दिवसांपूर्वी शहरातील ४ आधार नोंदणी केंद्रापैकी ३ आधार केंद्र बंद करण्यात आले आहेत. संपूर्ण तालुक्यातील नागरिक शहरामध्ये प्रशासकीय कार्यालयाच्या ठिकाणी येत असतात. ग्रामीण भागात जरी या सुविधा असल्या तरी प्रवासाच्या आणि सर्व सोयींचा विचार करून शहरातच येतात; मात्र राजकीय दबावाला बळी पडत प्रशासनाने आधार नोंदणी केंद्र बंद केल्यामुळे शेकडो नागरिकांची गैरसोय होत आहे. हे केंद्र पुन्हा सुरू करण्यासंदर्भात अथवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
--
आशासेविकांसाठी रत्नागिरी टेस्ट ट्यूब सेंटरतर्फे शिबिर

रत्नागिरी ः रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी रिसर्च सेंटरतर्फे येत्या रविवारी (ता. २६) लांजा येथे आशा सेविकांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या संचालिका, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर डॉ. शिंदे रुग्णांची मोफत तपासणीही करणार आहेत. लांजा नागरी पतसंस्थेच्या सभागृहामध्ये सकाळी २० ते २ या वेळेत आशासेविकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दुपारी २ ते ४ या वेळेत डॉ. शिंदे लांजा व परिसरातील रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. येथील गरजू रुग्णांचे रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये माफक दरामध्ये आयव्हीएफसुद्धा केले जाणार आहे. आशासेविका ग्रामीण भागात घराघरात जाऊन महिलांशी थेट संवाद साधतात. त्याच आशासेविका कोकणामध्ये असणाऱ्या वंध्यत्वाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन डॉ. शिंदे करणार आहेत. रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर हे कोकणातील पहिले व सुपरिचित सेंटर आहे. टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये आययूआय, आयव्हीएफ, इक्सी, उसाईट फ्रीझिंग, एम्ब्रिओ फ्रीझिंग, स्पर्म फ्रीझिंग, अ‍ॅड्रोलॉजी लॅबोरेटरी आदी सुविधा उपलब्ध आहेत. आतापर्यंत अनेक दाम्पत्यांना अपत्यप्राप्तीचा आनंद इथून मिळाला आहे. गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरतर्फे करण्यात आले आहे.
----
हवाईदल संधींबाबत फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये मार्गदर्शन

रत्नागिरीः फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतीय हवाईदल (दिल्ली) यांच्यामार्फत इंडक्शन पब्लिसिटी एक्झिबिशन व्हेईकल रोड ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले. या ड्राईव्हमध्ये भारतीय हवाईदलातील संधी, भारतीय हवाईदलातील प्रशिक्षण व जीवन तसेच फ्लाइंग सिम्युलेटरविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. या ड्राईव्हसाठी भारतीय हवाईदलाच्यावतीने माहिती देण्यासाठी विंग कमांडर सिजोमोन के. व्ही., स्क्वाड्रन लीडर देवाशिष अय्यर, फ्लाईट लेफ्टनंट दया अगरवाल, फ्लाइंग ऑफिसर अंकित भट उपस्थित होते. या ड्राईव्हमध्ये फिनोलेक्स अॅकॅडमीतील ५०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. शहरातील जीजीपीएस व रा. भा. शिर्के प्रशालेतील १२० विद्यार्थी व ५ शिक्षकांनी सहभाग घेतला.
----