रत्नागिरी- ॲड. पाटणे यांच्या लिखित रामशास्त्री चरित्राचा इंग्रजी अनुवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- ॲड. पाटणे यांच्या लिखित रामशास्त्री चरित्राचा इंग्रजी अनुवाद
रत्नागिरी- ॲड. पाटणे यांच्या लिखित रामशास्त्री चरित्राचा इंग्रजी अनुवाद

रत्नागिरी- ॲड. पाटणे यांच्या लिखित रामशास्त्री चरित्राचा इंग्रजी अनुवाद

sakal_logo
By

rat२३p१.jpg- रत्नागिरी ः अॅड. विलास पाटणे लिखित रामशास्त्री चरित्राच्या इंग्रजी अनुवाद पुस्तकाचे मुखपृष्ठ.


रामशास्त्रींचे चरित्र आंतरराष्ट्रीय कॅन्व्हासवर
लेखक अॅड. पाटणे ; अॅड. रमाकांत खलप यांनी केला अनुवाद
रत्नागिरी, ता. २३ः शास्त्रानुसार न्याय होईल अणि न्यायव्यवस्थेला नाती मंजूर नसतात असं म्हणणारे न्यायमूर्ती रामशास्त्री मराठी भाषिकेतरांना तसेच विदेशियांनाही समजले पाहिजे. न्यायाधीश म्हणून रामशास्त्रींचे स्थान अद्वितीय आहे. निःस्पृह, बाणेदार, निष्कलंक असे त्यांचे चरित्र न्यायसंस्थेला दीपस्तंभाप्रमाणे आहे. त्यांचे चरित्र जागतिक व्यासपीठावर जाण्याची गरज आहे. याच भूमिकेतून रामशास्त्री पुस्तकाच्या इंग्रजी संस्करणाचा प्रयोग करतो आहोत, अशी माहिती लेखक ॲड. विलास पाटणे यांनी दिली.
रामशास्त्री इंग्रजी अनुवादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पणजी येथे शनिवारी (ता. २५) सायं. ५ वा. होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजीपिठाचे न्यायमूर्ती महेश सोनंक, गोवा सरकारचे अॅड. जनरल देविदासजी पांगंम आणि पणजी हायकोर्ट बारचे अध्यक्ष ॲड. जीलमन परेरा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.
अॅड. पाटणे लिखित मराठी पुस्तकाचे प्रकाशन दोन वर्षांपूर्वी झाले होते. त्या वेळी याचा इंग्रजी अनुवाद व्हायला हवा, अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. माजी कायदेमंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी रामशास्त्री पुस्तकाच्या इंग्रजी संस्करणाचा संकल्प पूर्णत्वास नेला. याचा सर्व अक्षर रसिकाना समाधान व आनंद आहे. वाचन, व्यासंग व बहुश्रुततेमुळे त्यांच्या लेखनाला विद्वत्तेची किनार लाभली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या सुंदर अभिप्रायामुळे पुस्तकाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. रामशास्त्री यांचे चरित्र वैश्विक न्यायव्यवस्थेसंदर्भात महत्वाचे असल्याने या इंग्रजी संस्करणाचे संदर्भमुल्य अधोरेखित होईल. इंग्रजी पुस्तकांमुळे रामशास्त्रींचे चरित्र आंतरराष्ट्रीय कॅन्व्हासवर जाईल याचा आनंद आहे, असे ॲड. पाटणे म्हणाले.