रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

जिल्हा नगर वाचनालयात
मंगळवारी सुविनय दामलेंशी संवाद
रत्नागिरी ः रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सभागृहात येत्या २७ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वा. कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील वैद्य सुविनय दामले यांचा संवाद कार्यक्रम आहे. दामले उवाच या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते नेहमीच मार्गदर्शन करत असतात. त्यांचे आरोग्यविषयक व्हिडिओंचे ५०० हून अधिक भाग प्रसारित झाले आहेत. आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण तंदुरुस्त कसे राहू शकतो या विषयी दामले या कार्यक्रमातून त्यातील काही अनुत्तरित विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. या चर्चेतून सर्वसामान्यांच्या मनातील आरोग्यविषयक प्रश्नांचे शंकासमाधान केले जाणार आहे. जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

कंझ्युमर्स शॉपी प्रदर्शनाकरिता आवाहन
रत्नागिरी ः कंझ्युमर्स शॉपी हे गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन पटवर्धन हायस्कूलच्या पटांगणावर १९ ते २३ एप्रिल या कालावधीत आयोजित केले आहे. यामध्ये मोठमोठ्या कंपन्यांसह स्थानिक उद्योजकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन आनंद ट्रेडने केले आहे. या प्रदर्शनात भारतातील नामांकित कंपन्या, महिला व लघुउद्योजक यांची विविध उत्पादने असतात तसेच ही उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपन्यांचे प्रतिनिधी उत्पादनांची प्रात्यक्षिके दाखवतात व ग्राहकांच्या शंकांचे निरसन करत असतात. चहा, सौंदर्यप्रसाधने, वॉटर प्युरिफायर, नॉनस्टिक कुकवेअर, ओव्हन्स, सुईंग मशिन, मिक्सर, फूड प्रोसेसर, अगरबत्ती, कार्पेटस, बेडशीट्स, लहान मुलांचे कपडे व खेळणी, इमिटेशन ज्वेलरी, फर्निचर, स्टेनलेस स्टीलच्या विविध वस्तू आणि खाद्यपदार्थही या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. स्थानिक उद्योजकांनीही या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी आनंद ट्रेडच्या मोहाडीकर यांच्याशी संपर्क साधावा.

केळशीत २६ला क्रिकेट स्पर्धा
मंडणगड ः केळशी देव्हारे क्रीडा कमिटीच्यावतीने २६ फेब्रुवारीला स्व. प्रमोद महाजन मैदान कांदिवली वेस्ट येथे भव्यदिव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा पर्व ४थे या चॅम्पियन चषक २०२३ स्पर्धेचे नियोजन केले आहे. या स्पर्धेत दापोली-मंडणगड तालुक्यातील बलाढ्य नामांकित संघाचा सहभाग असून, ही स्पर्धा केळशी देव्हारे क्रीडा कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश कुळे, अध्यक्ष सागर जोशी व कमिटीचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात येणार आहे. स्पर्धेत २८ संघांचा सहभाग असून, प्रथम २० हजार, द्वितीय १० हजार, तृतीय ५ हजार, चतुर्थ २ हजार व आकर्षक चषकसह उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर अशा पारितोषिकांनी विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

---------

तृणधान्याचे आहारातील महत्व समजावले
पावस ः लांजा तालुक्यातील जोशीगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व व तृणधान्यापासून बनवले जाणारे विविध पदार्थ या विषयी मार्गदर्शन कृ. स. श्रीम. जे. ए. गडाख यांनी केले. कार्यक्रमास बचत गट अध्यक्षा धनश्री जोशी, कृषिसखी तसेच इतर महिला उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com