रत्नागिरी ः तालुक्यातील 100 शेतकऱ्यांची अभ्यास सहल

रत्नागिरी ः तालुक्यातील 100 शेतकऱ्यांची अभ्यास सहल

- rat२३p५.jpg-KOP२३L८४७३९ कोल्हापूर ः येथील लँडक्राफ्ट अॅग्रोच्या प्रकल्पात माहिती घेणारे महिला शेतकरी.

तालुक्यातील १०० शेतकऱ्यांची अभ्यास सहल
जेएसडब्ल्यूचा पुढाकार ः तंत्रज्ञानाची घेतली माहिती
रत्नागिरी, ता. २३ ः जेएसडब्ल्यू फाउंडेशनतर्फे रत्नागिरी तालुक्यातील १०० शेतकऱ्यांची लँडक्राफ्ट अॅग्रो (इचलकरंजी, कोल्हापूर) येथे अभ्यास सहल पार पडली. गटशेतीचे फायदे व विदेशी भाजीपाला साठीची बाजारपेठ या विषयी शेतकऱ्यांनी माहिती घेतली. या सहलीत जयगड पंचक्रोशीतील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी, महिला बचतगट, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य सहभागी झाले होते.
लँडक्राफ्ट अॅग्रोने भारतात स्थानिक पातळीवर घेतलेल्या सेंद्रिय उत्पादनाच्या उत्पादनात क्रांती घडवून आणली आहे. जवळपास भारतभर २०० एकरमध्ये पसरलेले आणि १०० टक्के पौष्टिक आणि सेंद्रिय फळे, भाज्या आणि औषधी वनस्पतीवर काम सुरू आहे. सामाजिक व कृषी क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या जेएसडब्ल्यू फाउंडेशन रत्नागिरी (जिंदाल कंपनी) यांच्याकडून कृषिक्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाच्या जोडीने व नावीन्य शेतीपद्धतीद्वारे कोकणातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्न सुरू असतो आणि याच उद्देशाने तालुक्यातील शेतकऱ्यांना नावीन्य शेतीपद्धत व शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी व इतर शेतकऱ्यांप्रमाणे कोकणातील शेतकऱ्यांचा पण आत्मविश्वास वाढावा याकरिता या अभ्याससहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीमध्ये शेतकऱ्यांना मातीविरहित शेती, नियोजनबद्ध पद्धतीने शेती कशी करावी तसेच गटशेतीचे फायदे व विदेशी भाजीपालासाठीची बाजारपेठ इत्यादी गोष्टी अभ्यासास मिळाली. जेएसडब्ल्यू फाउंडेशन रत्नागिरी (जिंदाल कंपनी) मार्फत यापुढे सुद्धा अशाचप्रकारे अभ्याससहलींचे व शेतीविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी सर्व शेतकऱ्यानी विनंती केली व आभार मानले आणि निश्चितच या अभ्याससहलीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. ही सहल यशस्वी होण्यासाठी जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे सीएसआर प्रमुख अनिल दधीच यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ अधिकारी पाटील व मयूर पिंपळे, निकिता हंगे, पवन भडसावळे आदींनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com