अल्पमुदत अभ्यासक्रमासाठी 31 मार्चपर्यंत अर्जांचे आवाहन

अल्पमुदत अभ्यासक्रमासाठी 31 मार्चपर्यंत अर्जांचे आवाहन

अल्पमुदत अभ्यासक्रमासाठी
३१ मार्चपर्यंत अर्जांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, ता. २३ : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागामार्फत बेरोजगार अल्पसंख्यांक युवक-युवतींसाठी ''टेक्निशन इन्स्ट्रुमेनशन'' (Technician Instrumentation) या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन दोडामार्गचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्र. प्राचार्य बी. पी. सोनवणे यांनी केले आहे.
अभ्यासक्रम ४२० तासांचा असून प्रशिक्षण पूर्णतः निशुल्क आहे. अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता दहावी उत्तीर्ण आहे. अभ्यासक्रम हा एनएसक्यूएफ लेवल ४ (NSQF level ४) चा असून मुस्लीम, शीख, पारसी, जैन, बुद्धिष्ठ व ख्रिश्चन आदी अल्पसंख्यांक उमेदवार हे प्रशिक्षण प्रवेशास पात्र असतील. दहावी गुणपत्रिका झेरॉक्स, अल्पसंख्यांक असल्याचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो आदी कागदपत्रे प्रवेशासाठी आवश्यक आहेत. १ एप्रिलपासून या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सुरू होत असून प्रवेश मर्यादा ३० उमेदवार आहे. या प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी प्रशिक्षण समन्वयक आर. डी. जानवेकर आणि एस. के. चारी यांच्याशी संपर्क करावा किंवा प्रत्यक्ष संस्थेमध्ये येऊन कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
................
‘महात्मा बसवेश्वर’ पुरस्कारासाठी आवाहन
सिंधुदुर्गनगरीः वीरशैव-लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थेला महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी इच्छुक पात्रताधारक व्यक्ती वा संस्थेने सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयामध्ये रीतसर अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टया विकास होण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, कलात्मक, सांस्कृतिक, समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार व समाज सेवक व त्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थानी विहीत नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय येथे सादर करावा. अर्जासोबत विना दुराचार प्रमाणपत्र, गैरवर्तनासंबंधी खटल्यात किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र, स्वतःचे अलीकडील दोन फोटो, पेपर कात्रणे, समाज कार्याची माहिती व इतर आवश्यक कागदपत्रे जोडावीत, असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com