पुष्पसेन सावंत यांना कुडाळात अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुष्पसेन सावंत यांना कुडाळात अभिवादन
पुष्पसेन सावंत यांना कुडाळात अभिवादन

पुष्पसेन सावंत यांना कुडाळात अभिवादन

sakal_logo
By

swt२३८.jpg
८४७६६
कुडाळः बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये पुष्पसेन सावंत यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

पुष्पसेन सावंत यांना अभिवादन
कुडाळः बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेला अधिकारवाणीने मार्गदर्शन करणारे, कुडाळ-वेंगुर्ले मतदार संघाचे माजी आमदार (कै.) पुष्पसेन सावंत यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त त्यांना संस्थेमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रा. अरुण मर्गज, प्रा. परेश धावडे यांनी मनोगते व्यक्त केली. उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये प्रा. योगीता शिरसाट, प्रा. प्रांजना पारकर, प्रा. अर्जुन सातोस्कर, मंदार जोशी, प्रा. प्रणाली मयेकर, प्रा. शांभवी आजगावकर-मार्गी, चेतन मोरजकर उपस्थित होते.
----------
swt२३३०.jpg
८४८४२
मालवणः जप्त केलेला वाळूसाठा.

जप्त वाळू साठ्याचा २८ रोजी लिलाव
मालवण, ता. २३ : येथील तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने महिन्याभरापूर्वी देवली येथे ३३२ ब्रास अनधिकृत वाळू साठा जप्त केला होता. तर आंबेरी येथे ११४४ ब्रास अनधिकृत वाळू साठा जप्त केला होता. प्रतिब्रास ६०० एवढा दर निश्चित करून या वाळू साठ्याची लिलाव प्रक्रिया २८ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता देवली व आंबेरी येथील तलाठी कार्यालय येथे होणार आहे, अशी माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली आहे.
-------------