राजापूर ःउपसलेला गाळ वाहून नेण्यात अडचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ःउपसलेला गाळ वाहून नेण्यात अडचणी
राजापूर ःउपसलेला गाळ वाहून नेण्यात अडचणी

राजापूर ःउपसलेला गाळ वाहून नेण्यात अडचणी

sakal_logo
By

rat२३p३०.jpg ःवKOP२३L८४८४४
राजापूर ः पोकलेनच्या साहाय्याने सुरू असलेला गाळ उपसा.


उपसलेला गाळ वाहून नेण्यात अडचणी

राजापूरची व्यथा ; वाहतुकीसाठी ६ डंपर्सची गरज

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २३ ः कोदवली नदीपात्रातील गाळाचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असला तरी उपसा केलेल्या गाळाची नदीपात्रातून वाहतूक होताना दिसत नाही. गाळ वाहतुकीसाठी डंपरची कमतरता भासत असून, गाळाची नदीपात्रातून वाहतूक करण्यासाठी ६ डंपर्स उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी गाळ निर्मुलन समितीने नाम फाउंडेशनकडे केली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे नाम फाउंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी आश्‍वासित केले.
कोदवली नदीपात्रातील गाळ उपशाच्या कामासंबंधित प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये गाळ निर्मुलन समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीला नाम फाउंडेशनचे पदाधिकारी समीर जानवलकर, राजेश्‍वर देशपांडे यांच्यासह गाळ निर्मुलन समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
शहरातून वाहणार्‍या अर्जुना-कोदवली नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचा संचय झालेला असून, पावसाळ्यामध्ये वारंवार पूर येण्यास नदीपात्रामध्ये साचलेला गाळ कारणीभूत ठरतो. त्यामुळे या गाळाचा उपसा करण्याची मागणी राजापूरवासीयांकडून गेल्या कित्येक वर्षापासून केली जात आहे. मात्र, त्या दृष्टीने शासनस्तरावर कोणत्याही हालचाली न झाल्याने नाम फाउंडेशनच्या पुढाकाराने महसूल विभाग, नगर पालिका यांचे सहकार्य आणि लोकवर्गणीतून गाळाचा उपसा करण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. जलसंपदा विभागासह नाम फाउंडेशनने उपलब्ध करून दिलेल्या पोकलेनच्या साहाय्याने सद्यःस्थितीमध्ये गाळाचा उपसा केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या कामामध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचा उपसा करण्यात आला आहे. त्यापैकी अनेकांनी सामाजिक बांधिलकीतून उपलब्ध करून दिलेल्या डंपरच्या साहाय्याने उपसा केलेल्या गाळाची नदीपात्रातून वाहतूक करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही उपसा केलेला गाळ नदीपात्रामध्ये पडून आहे. त्यामुळे या गाळाची वाहतूक करण्यासाठी डंपर्स उपलब्ध करून देण्याची मागणी गाळ निर्मुलन समितीने नाम फाउंडेशनकडे करण्यात आली आहे. या मागणीवर चर्चा करताना नाम फाउंडेशनने जानवलकर यांनी डंपर्स उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली.


चौकट
बागायतदारांना आवाहन
ज्या बागायतदारांना नदीपात्रातील उपसलेल्या मातीयुक्त गाळाची आवश्यकता आहे त्यांनी नगर पालिका प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन गाळ निर्मुलन समितीकडून करण्यात आले आहे.