दाभोळ ःआम्ही शाखा कधीही ताब्यात घेऊ शकलो असतो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ ःआम्ही शाखा कधीही ताब्यात घेऊ शकलो असतो
दाभोळ ःआम्ही शाखा कधीही ताब्यात घेऊ शकलो असतो

दाभोळ ःआम्ही शाखा कधीही ताब्यात घेऊ शकलो असतो

sakal_logo
By

आम्ही शाखा कधीही ताब्यात घेऊ शकलो असतो
आमदार योगेश कदम ; असेसमेंट, लाईटबिल जुन्या शिवसैनिकांनावे
दाभोळ, ता. २३ ः आम्ही आमची शाखा कधीही ताब्यात घेऊ शकलो असतो; पण आम्ही संयम बाळगला होता आणि आज निर्णय झाल्यावरही विरोधक या शाखेवर अधिकार सांगत असतील तर ते चुकीचेच आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने जो धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय दिला हे प्रमाणिकपणे काम करत असल्याचे फलित असून, जो विजय झाला आहे. तो शिवसैनिकांच्या प्रामाणिकतेचा विजय आहे, असे प्रतिपादन आमदार योगेश कदम यांनी दापोली शहर शाखा बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी ताब्यात घेतल्यानंतर केले.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ‘अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राला सत्ता संघर्षाच्या, पक्ष आणि चिन्हाच्या निकालानंतर महाराष्ट्रात पहिली प्रतिक्रिया जी उमटली ती दापोली मतदारसंघात. ज्या शाखेबद्दल आपण बोलतोय त्या शाखेचे आमचे शहरप्रमुख यांच्या नावावरती असेसमेंट, लाईटबिल आहे. त्याचप्रमाणे सर्व रेकॉर्ड हे आमच्या जुन्या शिवसैनिकांच्या नावाने आहे. आम्ही आमची शाखा कधीही ताब्यात घेऊ शकलो असतो; पण आम्ही संयम बाळगला होता आणि निर्णय झाल्यावरही विरोधक या शाखेवर अधिकार सांगत असतील तर ते चुकीचेच आहे, आम्हाला कोणतेही वाद करायचे नाहीत, कुठेही हाणामाऱ्या करायच्या नाहीत. आम्हाला सरळ मार्गाने विकास करायचा आहे व निवडणुका जिंकायच्या आहेत. आम्ही संयमी नक्की आहोत; पण उगाचच कोणी अंगावर येत असेल तर त्याला आम्ही शिंगावर घेण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
येत्या काही दिवसात शिवसेनेकडे भविष्यात मतदारांचा ओघ हा वाढत जाणार आहे. काही चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगत निवडणूक आयोगाचा निकाल लागल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात जर का खऱ्या अर्थाने भगवा कोठे फडकला असेल तर तो दापोली मतदारसंघामध्ये फडकला,असा दावा त्यानी केला.