रत्नागिरी ः ऐतिहासिक सहभोजनाचा आणि भजनाचा आज सोहळा

रत्नागिरी ः ऐतिहासिक सहभोजनाचा आणि भजनाचा आज सोहळा

अर्धा कॉलम फोटो घेणे...

ऐतिहासिक सहभोजन, भजनाचा आज सोहळा
भागोजीशेठ कीर यांचे पूण्यस्मरण ;७९ वर्षांनंतर पुन्हा सुरू
रत्नागिरी, ता. २३ ः दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या ७९ व्या पुण्यतिथीनिमित्त येथील पतितपावन मंदिरात उद्या (ता. २४) सर्व समाजाच्या एकत्रित सहभोजनाचा आणि भजनाचा ऐतिहासिक सोहळा होणार आहे. यामध्ये अनेकांनी सढळहस्ते सार्वजनिक कार्यात मदत केली आहे. काहींनी धान्य दिले तर काहींनी देणगी जाहीर केली आहे. त्यामुळे ७९ वर्षांनंतर पतितपावन मंदिरमध्ये होणाऱ्या हा सहभोजनाचा कार्यक्रम समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या निधनानंतर पतितपावन मंदिरातील बंद पडलेला सहभोजन आणि सहभोजनाचा कार्यक्रम अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ, पतितपावन मंदिर ट्रस्ट आणि रत्नागिरी तालुका भंडारी समाजसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुन्हा सुरू होणार आहे. त्या काळी देश स्वतंत्र करण्यासाठी स्पृश्य, अस्पृश्य भेदभाव मिटवण्यासाठी सहभोजनाची आवश्यकता होती; परंतु आता देशभक्ती, धर्माचे रक्षण आणि प्रामाणिकपणा, दानशूरता अंगीकारण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी हा सहभोजन कार्यक्रम आदर्शवत ठरेल. महाभारतातील कर्णालाही लाजवेल, असे भागोजीशेठ कीर यांचे कार्य भजनाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात येणार आहे.
भागोजीशेठ कीर यांचे कार्य सर्व समाजांच्या माध्यमातून पुढे नेले जावे यासाठीचा हा प्रयत्न आहे. कीर यांची ७९वी पुण्यतिथी उद्या (ता. २४) आहे. या दिवशी अठरापगड जाती, बारा बलुतेदार एकत्र येऊन भैरी मंदिरमार्गे सकाळी ९ वा. प्रभातफेरी निघेल. ती राममंदिर पेठकिल्ला, भागेश्वर मंदिर परत मांडवी, घुडेवठार, चवंडेवठार, नगर वाचनालय, लॉ कॉलेज, मारूती मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जयस्तंभ, राममंदिर, आठवठा बाजार, टिळकआळी, गाडीतळ, पतितपावन मंदिर समाप्ती होईल. त्यानंतर दुपारी १२ ते ४ सहभोजन व भजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. यासाठी सर्व भागोजीशेट प्रेमींनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ, पतितपावन मंदिर ट्रस्ट आणि रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com