
शेवरे मंडळाच्यावतीने वार्षिक सभा
Rat23p11.jpg ः मुंबई ः शेवरे गावचे सुपुत्र व पत्रकार दीपक महाडिक यांचा सत्कार करताना मंडळाचे पदाधिकारी.
शेवरे मंडळाच्यावतीने वार्षिक सभा
मंडणगड ः तालुक्यातील नवतरुण विकास मंडळ शेवरे मुंबई या मंडळाच्यावतीने 19 फेब्रुवारीला विरार येथील हिंदू समाज सभागृह येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त मंडळाच्या वार्षिक सभेचेही आयोजन करण्यात आले. मंडणगड तालुक्यातील शेवरे गावातील बहुसंख्य चाकरमानी मुंबई शहरात तसेच उपनगरात राहतात. प्रत्येक वर्षी हे मंडळ गावच्या उन्नतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असते; परंतु या गेली दोन वर्ष कोरोनाचे संकटामुळे तीन वर्षे कोणतेही कार्यक्रम झाले नव्हते. या वर्षी मंडळाच्यावतीने शिवजयंती उत्सव व वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेचे अध्यक्षस्थान रवींद्र जागडे यांनी भूषवले. मंडळाचे सेक्रेटरी नीलेश महाडिक यांनी आपल्या भाषणात गावविकाससंदर्भात मार्गदर्शन करून शेवरे गाव आदर्श कसे होईल याकडे नवतरुणांनी लक्ष घालण्याची गरज आहे, असे आवाहन केले. मंडळाचे अध्यक्ष गौरीशंकर साटम यांनी एप्रिल महिन्यात मंडळाच्यावतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. यानिमित्त नुकतेच प्रबोधनकार ठाकरे समाजगौरव तसेच लोककल्याणकारी गौरव पुरस्कार मिळालेले ज्येष्ठ पत्रकार दीपक महाडिक यांचा मंडळाच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला तसेच जय वरदान क्रिकेट संघ या संघाचाही सत्कार करण्यात आला.