
सारस्वतची डिजिटल सेवा सुधारण्यासाठी टॅगिटसोबत भागीदारी
rat२४१२.txt
बातमी क्र.. १२ (टुडे ३ साठी)
डिजिटल सेवांसाठी सारस्वतची टॅगिटसोबत भागीदारी
रत्नागिरी, ता. २३ ः भारतातील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक म्हणून सारस्वत बँकेचे नाव आहे. रिटेल आणि कॉर्पोरेट ग्राहकांना विविध डिजिटल बँकिंग सुविधा पुरवण्यासाठी बँकिंग क्षेत्रात डिजिटल पर्याय आणि सुविधा पुरवण्यात आघाडीची कंपनी असलेल्या टॅगिटबरोबर नुकताच करार केला आहे.
सारस्वत बँकेने आपले क्षेत्र महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये विस्तारलेले आहे. बँकेने मार्च २०२२ अखेरीस एकूण ७१ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तर २७५.०२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला. बँकेचे निष्क्रिय मालमत्ता मूल्य (एनएव्ही) सर्वाधिक अल्प म्हणजेच ०.६५ टक्के इतके आहे. मोबिक्स डिजिटल बँकिंग मंचामुळे नवीन डिजिटल सेवा सुरू करण्याच्या बँकेच्या क्षमतेला वेग मिळणार आहे. त्यामुळे सतत नावीन्यपूर्ण आणि अधिकाधिक सेवा सुरू करत ग्राहकांची संख्या वाढवता येणार आहे. नवीन डिजिटल सेवांमुळे अधिकाधिक डिजिटल चॅनल्सचा वापर करण्याचा बँकेच्या ग्राहकांचा वेग वाढणार आहे. बहुपर्यायी प्रमाणिकरण, बायोमेट्रिक लॉगिन आदींमुळे सुरक्षितता मिळते. ग्राहकांनी डिजिटल चॅनेलचा अवलंब करण्यास गती देण्यासाठी विविध चॅनेल्सचा वापर, ग्राहकांसाठी स्थिर आणि ''नियमित कार्यरत'' वातावरण देण्यावर बँकेने भर दिला आहे. नवीन भागीदारीबाबत बोलताना सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर म्हणाले, नवीन युगातील तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आणि तंत्रज्ञानावर आधारित विविध उपक्रम राबवण्यात सारस्वत बँक नेहमीच आघाडीवर राहिली आहे. मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगच्या नवीन अॅप्लिकेशनद्वारे आमच्या ग्राहकांना सर्व चॅनेलयुक्त सुविधा प्रदान करण्यासाठी टॅगिटसोबतची आमचा भागीदारी हा असाच एक उपक्रम आहे. या निरंतर वाटचालीमध्ये ग्राहकांना अखंड संपर्क आणि समृद्ध असा अनुभव मिळणार आहे.