निवड

निवड

rat२४११.txt

बातमी क्र..११ (टुडे पान १ साठी, संक्षीप्त)

खेड शिवसेना तालुकाप्रमुखपदी धाडवे

खेड ः शिवसेनेचे तालुकाप्रमुख विजय जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्या त आली असून त्यांच्या जागी सचिन धाडवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून बुधवारी (ता. २२) तसे जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी सांगितले. तालुका सचिव म्हणून संघटना बळकटीसाठी केलेल्या योगदानाची दखल घेऊन धाडवे यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय सेना नेतृत्वाने घेतला. या निवडीनंतर जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. संघटना बळकटीसाठी अधिक जोमाने काम करून कार्यकर्त्यांना एकसंघ करणार असल्याचे धाडवे यांनी सांगितले.

--
- rat२४p१३.jpg ः
८४९७६
खेड ः क्युआर कोड सुविधेचा आरंभ करताना अध्यक्ष महादेव चव्हाण.

संतसेना नाभिक पतसंस्थेत क्युआर कोड सुविधा

खेड ः भरणे येथील श्री संतसेना नाभिक व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्थेत कार्यान्वित करण्यात आलेल्या क्युआर कोड सुविधेचा आरंभ संस्थेचे अध्यक्ष महादेव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सीताराम राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप तांबे, संचालक संजय पवार, विलास माने, गौतम तांबे, सहदेव पवार, वनिता चव्हाण, व्यवस्थापक राजेंद्र मोरे आदी उपस्थित होते. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

--

खेड तालुका काँग्रेसची बैठक

खेड ः खेड काँग्रेसची सभा येथील नगरपालिकेच्या सभागृहात झाली. यावेळी माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांनी मार्गदर्शनावेळी सार्वत्रिक निवडणुकीत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी भोस्ते ग्रामपंचायत सदस्यपदी खलिल फोफळणकर व हाजी एस. एम. मुकादम हायस्कूल व कॉलेज कमिटी चेअरमनपदी तालुकाध्यक्ष गौस खतीब यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सरचिटणीस द. भि. धुमक, जिल्हा उपाध्यक्ष अनंत जाधव, डॉ. विलास शेळके, सहकार विभाग प्रदेश चिटणीस अजिम सुर्वे, तालुका उपाध्यक्ष रमेश घोले, बशीर मुजावर, मुरलीधर बुरटे, शहर उपाध्यक्ष मंगेश भागवत, फसल देसाई, पर्यावरण जिल्हाध्यक्ष किरण तायडे, स्वराज गांधी, खलिल फोफळणकर, महमद काझी, शहराध्यक्ष अनिल सदरे उपस्थित होते.

-----------

सुकिवलीत शैक्षणिक साहित्य वाटप

खेड ः तालुक्यातील सुकिवली प्राथमिक शाळा क्र. १ मधील १७१ गरजू विद्यार्थ्यांना तालुका कोकण रहिवाशी मंच दिवा संघटनेच्यावतीने मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी माजी सरपंच सतीश निकम, सेक्रेटरी नीलेश पाटणे, खजिनदार मंगेश शेलार, संपर्कप्रमुख प्रवीण उत्तेकर, कार्याध्यक्ष संदेश कदम आदी उपस्थित होते.
--

फोटो
- rat२४p८.jpg ः
८४९६३
खेड ः राष्ट्रीय तायक्वाँदो स्पर्धेसाठी महाराष्ट्रात निवड झालेली विधी गोरे.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी विधी गोरे राज्यसंघात

खेड ः पुलगाव-वर्धा येथे झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय कॅडेट तायक्वाँदो स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कुलची विद्यार्थींनी विधी गोरे हीने रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनीधीत्व करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या यशामुळे तिची हैद्राबाद -तेलंगणा येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. वर्धा येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये राज्यातील २५ जिल्ह्यातील तब्बल ६०० खेळाडूंनी सहभाग दर्शवला होता. प्रशिक्षक कृणाल चव्हाण यांचे तिला मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
--


फोटो
- rat२४p९.jpg ः
८४९६४
खेड ः मुरडेत भूमिपूजन समारंभ कार्यक्रमाप्रसंगी व्यासपिठावर आमदार योगेश कदम यांचा सन्मान करताना सरपंच जाधव सोबत अन्य मान्यवर.

मुरडेत विविध कामांचे भूमिपूजन

खेड ः तालुक्यातील मुरडे-रामवाडी येथील विविध विकासकामांसाठी आमदार योगेश कदम यांच्या माध्यमातून १ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये खेमनाथ मंदिर रस्ता डांबरीकरण व खडीकरण, खेमनाथ मंदिरापर्यंतचे विद्युतीकरण व पथदिवे लोकार्पण, रामवाडी येथे स्मशानशेड बांधणे, समर्थनगर ते ब्राह्मणवाडी रस्ता डांबरीकरण, डिंगलवाडी येथे समाजमंदिर बांधणे, रस्ता डांबरीकरण व मोहल्ला ते गोठलवाडी रस्ता डांबरीकरणाचा समावेश आहे. या प्रसंगी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, तालुका सचिव सचिन धाडवे, सरपंच सोनाली जाधव, माजी सरपंच दिगंबर दळवी, दशरथ खामकर, प्रताप सांवत, रवींद्र रेवाळे, मनोहर शिबे, समीर जाधव, किरण डफळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com