कांदळवन कक्षातील वनरक्षकांची पदे रिक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदळवन कक्षातील वनरक्षकांची पदे रिक्त
कांदळवन कक्षातील वनरक्षकांची पदे रिक्त

कांदळवन कक्षातील वनरक्षकांची पदे रिक्त

sakal_logo
By

rat२४१३.TXT

बातमी क्र.. १३ (पान ३ किंवा २ साठी, मेन)

कांदळवन कक्षातील वनरक्षकांची पदे रिक्त

मंजुरीच्या कामांवर परिणाम ; वनविभागाच्या कर्मचाऱ्‍यांवर भिस्त
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ ः किनार भागातील कांदळवनांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्रात वनविभागांतर्गत कांदळवन कक्ष स्थापना करण्यात आला. दिवसेंदिवस या कक्षाचे काम वाढत आहे. या कक्षातील कर्मचाऱ्‍यांची पदे भरण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. तांत्रिक गोष्टींची पूर्तता करण्यासह प्रकल्प अंमलबजावणीत महत्वाचे असलेली वनरक्षकांची दोन पदे रिक्तच आहेत. त्यासाठी वनखात्याच्या वनसंरक्षकांवर अवलंबून राहावे लागत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कांदळवन वाढीसह आहे त्या हजारो किलोमीटरच्या कांदवळवनांच्या संरक्षणासाठी पावले उचलली जात आहेत. किनारी भागात बचतगटांच्या माध्यमातून अर्थार्जनासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. कांदळवनाचे प्रकल्प राबवतानाही वनविभागातील कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने नव्या प्रकल्पांची गतीही संथ झाली आहे. सागरी किनाऱ्‍यांवरील जैवविविधतेचे जतन करणे हे कांदळवन कक्ष करत आहे. कांदळवन संरक्षण, देखभाल, जीर्णोद्धार, पुनर्भरण, प्रजनन आणि शाश्वत वापर या उपक्रमांचा समावेश आहे. यातील वन्यजीव भूप्रदेशाचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन करण्याचे काम कांदळवन कक्ष व प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे. कांदळवन प्रतिष्ठानला सहकार्य करण्यासाठी आवश्यक असणारे वनरक्षक कर्मचारी जिल्ह्यात नियुक्त केलेले नाहीत. कांदळवन कक्षात कार्यरत असलेल्या वनरक्षकांच्या बदल्या तीन वर्षापूर्वी प्रादेशिक वनविभागात करण्यात आल्या; परंतु त्यांच्या जागी एकाही वनरक्षकाची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे कांदळवनचे प्रकल्प राबवताना प्रादेशिक वनविभागाच्या वनरक्षकांची मदत घ्यावी लागते. त्यामुळे कांदळवन प्रतिष्ठानच्या प्रकल्प समन्वयकांना व बचतगटातील सदस्यांनाही अनेकदा ताटकळत राहावे लागते. कांदळवन कक्षात वनरक्षकांची नियुक्ती झाल्यास अनेक कामे ही वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

कामे संथ गतीने

रत्नागिरी जिल्ह्यात ४६ गटांच्या माध्यमातून कांदळवन कक्ष व प्रतिष्ठानचे प्रकल्प सुरू आहेत. जिल्ह्यात मोठा खाडीकिनारा व कांदळवन असल्याने आणखी प्रकल्प या ठिकाणी सुरू होऊ शकतात; परंतु कर्मचाऱ्‍यांच्या रिक्त पदामुळे ही कामेही संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.