वेशभूषा स्पर्धेत आराध्या परब प्रथम

वेशभूषा स्पर्धेत आराध्या परब प्रथम

84981
सावंतवाडी ः येथे आयोजित वेषभूषा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत मान्यवर.

वेशभूषा स्पर्धेत आराध्या परब प्रथम
सावंतवाडी ः कोलगाव येथील माणुसकी प्रतिष्ठान आणि कोलगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वेशभूषा स्पर्धेत आराध्या परब हिने प्रथम क्रमांक पटकाविला. माही पडतेने द्वितीय तर वेदश्री परबने तृतीय क्रमांक पटकाविला. उत्तेजनार्थ दूर्वाश तर्फे आणि निधी नाईक यांची निवड करण्यात आली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर दुरभाटकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. या स्पर्धेला कोलगावमधून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अवघ्या एक ते दहा वयोगटातील मुलांनी या वेषभूषा स्पर्धेत सहभाग घेतला होता. डॉ. दुर्भाटकर यांच्या आजपर्यंतच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा माणुसकी प्रतिष्ठान व कोलगाव ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमानी शिवजयंती साजरी झाली. विजेत्यांसह सहभागी स्पर्धकांना माणुसकी प्रतिष्ठानतर्फे गौरविले.
--------
84991
लक्ष्मण ठाकूर यांना पदोन्नती
सावंतवाडी ः उद्योग संचालनालयात उद्योग अधिकारी पदावर कार्यरत असणारे लक्ष्मण ठाकूर यांची उद्योग संचालनालय, मुंबई यांच्याकडून उद्योग उपसंचालक पदावर पदोन्नती झाली आहे. श्री. ठाकूर हे सध्या राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून काम पाहतात. या अगोदर त्यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचेही विशेष कार्य अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. येथील विठ्ठल रुखमाई मंदिराचा गेल्या दोन दशकापासून जीर्णोद्धार, त्रिकाल साधना यामध्ये त्यांचा सहभाग आहे.
--
निराधार योजनेचा ५८ महिलांना लाभ
कुडाळ ः येथील नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत विधवा आणि निराधार महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी योजना राबविली होती. या योजनेअंतर्गत ५८ महिलांचे अर्ज येथील नगरपंचायतीकडे प्राप्त झाले होते. त्यानुसार नगरपंचायत हद्दीतील विधवा आणि निराधार महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. त्यामध्ये ५८ विधवांना याचा लाभ मिळाला. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात व्यवसायासाठी रक्कम जमा झाली आहे. यामुळे समाजातील विधवा तसेच निराधार महिलांना स्वावलंबी बनण्यास मदत होईल. याबाबतची माहिती नगराध्यक्षा आफ्रिन करोल, उपनगरध्यक्ष मंदार शिरसाट, महिला व बाल कल्याण अक्षता खटावकर तसेच महविकास आघाडीचे सर्व नगरसेवकांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com