पावस-गावडेआंबेरे-पूर्णगडला जोडणारा बंधारा धोकादायक

पावस-गावडेआंबेरे-पूर्णगडला जोडणारा बंधारा धोकादायक

rat२४p२२.jpg-
८५०१३
पावसः गावडेआंबेरे-बिर्जेवाडी व पूर्णगड दरम्यान बांधण्यात आलेल्या खारभूमी बंधाऱ्यावर खड्डे पडल्याने बंधारा धोकादायक झाला आहे.
(छायाः संतोष पोकडे)
---------
गावडेआंबेरे-पूर्णगडला
जोडणारा बंधारा धोकादायक
नुतनीकरणाची गरज ; खड्ड्यांमुळे वाहतूक धोक्याची
पावस, ता. २४ ः रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे-बिर्जेवाडी व पूर्णगड या दोन गावांना जोडणारा खारभूमी बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक दिवसेंदिवस वाढली आहे. त्यामुळे बंधाऱ्यावर खड्डे पडल्याने वाहतूक धोकादायक झाली आहे. या बंधाऱ्याचे तातडीने नुतनीकरण करणे गरजेचे आहे.
गावडेआंबेरे, मावळंगे, जांभूळआड, नातूंडे आदी परिसरात मोठ्या प्रमाणात पूर्णगड खाडीचे पाणी घुसते. त्यामुळे हा परिसर नापीक बनला होता. सन १९९२ च्या दरम्यान या दोन गावांना जोडण्यासाठी खारभूमी खात्याने संरक्षण बंधारा बांधला. त्यामुळे शेकडो एकर जमिनीवर पुन्हा पीक घेण्यास सुरवात झाली. परंतु या बंधाऱ्यावरून या परिसरातील अनेक लोक दुचाकी, चारचाकी गाड्या या बंधाऱ्यावरून नेतात. त्यामुळे सुमारे पंधरा किमी अंतर कमी होत असल्याने या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे भविष्यात रस्ता खराब होऊन ढासळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बंधार्‍यावरील मार्गाचे नुतनीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
या संदर्भात संतोष पोकडे म्हणाले, मुळात या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक बनल्यामुळे खारभूमी खात्याने मागणीनुसार बंधारा बांधण्यात आला आहे. परंतु या मार्गावरून गेल्यामुळे वळसा मारावा लागत नसल्याने अनेक लोक या मार्गावरून जातात. त्यामुळे या मार्गावर खड्डे पडले असून याकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात बंधारा कोसळण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com