चिपळूण ः शिवसेनेने सत्तेच्या खुर्चीसाठी समझोता केला

चिपळूण ः शिवसेनेने सत्तेच्या खुर्चीसाठी समझोता केला

ratchl243.jpg
85016
चिपळूणः संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा.
--------------
उद्धव ठाकरेंचा सत्तेसाठी समझोता
अजयकुमार मिश्रा ; मोदी सरकारचे निर्णय तळागाळात पोचवा
चिपळूण, ता. २४ः विरोधक काय बोलतात ही त्यांची निराशा आहे. आम्ही एकत्र मिळून निवडणुका जिंकल्या होत्या. महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष आणि त्या वेळच्या शिवसेनेला कौल दिला होता; परंतु शिवसेनेने केवळ खुर्चीसाठी भाजपला धोका दिला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण जीवनभर विरोध केला. त्यांच्याशीच उद्वव ठाकरेंनी समझोता केला, अशा शब्दात केंद्रीयमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी शिवसेनेवर टीका केली. राष्ट्रकल्याण प्राथमिकता मानून भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन मिश्रा यांनी केले.
मिश्रा यांच्याकडे भाजपतर्फे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत पालकत्व आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर झाले. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा प्रवास योजना संयोजक अतुल काळसेकर, मुंबईचे नगरसेवक लोकसभा प्रवास प्रभारी संजय लेले, चिपळूण -संगमेश्वर विधानसभा प्रभारी हरीभाई पटेल, भाजप प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार, माजी नगरध्यक्षा सुरेखा खेराडे, भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे, शेलेंद्र दळवी, तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहराध्यक्ष आशिष खातू, विधानसभा संयोजक प्रमोद अधटराव, रामदास राणे आदी उपस्थित होते.
या दौऱ्यात मिश्रा यांनी सकाळी प्रथम श्री भगवान परशुराम देवस्थान येथे जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर वाचासिद्ध यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. केंद्रातील मोदी सरकारने जनतेच्या हितासाठी घेतलेले निर्णय तळागाळापर्यंत पोहोचवा, असा सल्ला भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देताना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहा, असे आवाहन मिश्रा यांनी केले.
माजी आमदार प्रमोद जठार यांनी बूथ स्तरावरील कार्यकर्ते यांच्या जबाबदारी व कर्तव्यांबद्दल माहिती दिली. चिपळूणच्या ग्रॅव्हिटी योजनेसाठी केंद्र स्तरावरील मंजुरीसाठी माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, शहराध्यक्ष आशिष खातू व सहकाऱ्यांनी निवेदन दिले. निनाद आवटे पासपोर्ट पडताळणी ऑफिस चिपळूण येथे व्हावे यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय मंत्र्यांना दिला.

चौकट
गुणवंतांचा गौरव
या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या चिपळूणमधील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. नृत्य विषयात मानाची समजली जाणारी अलंकार पदवी मिळवल्याबद्दल स्कंधा चितळे, रांगोळी कलेमध्ये विक्रम रचणारे व इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवणारे रांगोळीकार संतोष केतकर, तायक्वांदोमध्ये राष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणारी शर्वरी घटे, आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संतोष जाधव व अमोल टाकले यांचा सन्मान मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com