राज्य नाट्य स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य नाट्य स्पर्धा
राज्य नाट्य स्पर्धा

राज्य नाट्य स्पर्धा

sakal_logo
By

rat२४२०.txt

बातमी क्र. .२० (पान २ साठी, मेन, ग्राफीक पद्धतीने घ्यावे.)
(टीप- आपल्याकडे सांस्कृतिक वाचणारे वाचक भरपूर आहेत.)

सं. राज्य नाट्य स्पर्धा--लोगो (१५ फेब्रुवारी टुडे पान दोन)

युवा कलाकारांच्या यशाने संगीत नाटकांना पुन्हा उभारी

निखळ आनंद देणारी स्पर्धा ; स्पर्धकांसह रसिकांचा उत्साह आश्वासक

नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ ः संगीत राज्य नाट्यस्पर्धांचा महोत्सव येथील वि. दा. सावरकर नाट्यगृहात झाला. जवळजवळ महिनाभर संगीतप्रेमी रसिकांना मेजवानी मिळाली. गोव्यासह एकूण २३ नाटकांचा सहभाग स्पर्धेत होता. संगीत नाटकांमध्ये युवा कलाकारांचा सहभाग आणि त्यांना मिळालेले यश हे या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य ठरले. या निमित्ताने युवा कलाकारांचा शास्त्रीय संगीताकडे, संगीत नाटकांकडे कल वाढत असल्याचे स्पर्धेने अधोरेखित झाले. तरुण पिढीचा उत्साह आणि मिळालेले यश लक्षात घेता संगीत नाटकांना पुन्हा उभारी मिळत आहे. राज्य शासनाच्या या चळवळीलाही या निमित्ताने यश मिळाले आहे.
--
फोटो ओळी
- rat२४p२५.jpg-
८५०२८
घनश्याम जोशी

परस्पर सहाय्यक मंडळ वाघांबे (मुंबई) या संस्थेच्या संगीत सुवर्णतुला या नाटकाला गतवर्षी प्रथम क्रमांक मिळाला होता. प्रथम पारितोषिकासह सात वैयक्तिक पारितोषिक मिळाली. नाट्यरसिकांसह साऱ्यांच्याच अपेक्षा दुणावल्या. यापेक्षा अधिक ताकदीचे नाटक स्पर्धेत सादर करावे अशी कलाकार, साहाय्यकांचे ठरले. त्याप्रमाणे संगीत मंदारमाला नाटकाची निवड करण्यात आली. नाट्य सादरीकरणांनतर विलक्षण समाधान वाटले उपस्थित रसिक जाणकार, रंगकर्मी यांची मन समाधान पावल्याची प्रतिक्रिया निखळ आनंद देऊन गेली.
- घनश्याम जोशी
दिग्दर्शक, संगीत मंदारमाला (प्रथम पारितोषिक)
---
फोटो ओळी
- rat२४p२६.jpg-
८५०२९
अमेय धोपटकर

राज्यस्तरीय संगीत नाट्यस्पर्धेत आमच्या कालारंग नाट्यप्रतिष्ठानने सादर केलेले ''संगीत मल्लिका'' नाटकाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. स्पर्धेकरिता मल्लिकासारखी संहिता लिहिताना हिंदी, उर्दू आणि मराठी या तिन्ही भाषांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. प्रसंगानुरूप वाढत जाणारी उत्कंठा आणि लयबद्ध नाट्यपदं ही या संहितेची जाणीवपूर्वक निर्माण केलेली बलस्थानं होत. संगीत नाटकाच्या परंपरेशी उत्तम सांगड घालत तयार केलेल्या सुमधूर चाली आणि एका नाट्याकृतीला आवश्यक असणारे चांगले दिग्दर्शन यामुळेच हे यश लाभले आहे.
- अमेय धोपटकर,
लेखक, संगीत मल्लिका (प्रथम पारितोषिक)
---
फोटो ओळी
- rat२४p२७.jpg-
८५०३०
विजय रानडे
----
एका गायिकेचा प्रवास आणि तोही गझल गायिकेचा. यामुळे नाट्यपदांना चाली लावताना पारंपरिकतेसोबतच सुगमकडे झुकणारी गाणी यांचा मेळ बसवणे महत्वाचे होते. प्रसंगानुरूप संगीत देण्याचा प्रयत्न केला तसेच शब्दांना अनुसरून वेगवेगळ्या तालात व रागांमध्ये चाली लावल्या आहेत. त्यात केदार लिंगायत (तबला) आणि मंगेश चव्हाण (पखवाज) या दोन वादकांनीही खूप मेहनत करून तालसाथ केलीय. अमेय धोपटकर यांनी अप्रतिम लेखन केलेले नाटक संगीतबद्ध करायला मिळाले. नाटकातील गाण्यांना चाली लावताना सर्वांनी अतिशय चांगली मेहनत केली आणि नितीन जोशी यांनी उत्तम अभिनयाचे मार्गदर्शन केले.
- विजय रानडे,
संगीतकार- संगीत मल्लिका (प्रथम पारितोषिक)
---
फोटो ओळी
- rat२४p२८.jpg-
८५०३१
जान्हवी खडपकर

प्रत्येक मुलीला सगळ्या गोष्टींपेक्षा आई-वडिलांचा पाठिंबा गरजेचा असतो आणि त्यांचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत म्हणून मी हे करू शकले. त्याचबरोबर दुसरी बाजू म्हणजे गुरूंचे मार्गदर्शन. कलारंग नाट्य प्रतिष्ठान वरवडे या संस्थेने मला ''संगीत मल्लिका'' या नवीन नाटकामध्ये काम करण्याची संधी मिळाली. अभिनयाबद्दल मला नाटकाचे दिग्दर्शक नितीन जोशी यांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले तसेच नाटकाचे लेखक अमेय धोपटकर यांचे लेखन आणि विजय रानडे यांचे कमालीचे संगीत खूप छान होते.
- जान्हवी खडपकर
संगीत मल्लिका (गायन रौप्यपदक)
---
फोटो ओळी
- rat२४p२९.jpg-
८५०३२
तन्वी मंगेश मोरे


संगीत मल्लिकामधील रूईनाच्या भूमिकेसाठी मला गायन गुणवत्तेचे प्रमाणपत्र मिळाले. एखाद्या नाटकात अभिनय करून गाणं सादर करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. पण मिळालेल्या यशाने हा अनुभव अधिक आनंददायी ठरला. माझ्या गुरू विनया परब यांनी गायन शिकवताना मला गाणं म्हणण्याचा आत्मविश्वासही दिला आहे. त्याचा फायदा अभिनय साकारताना झाला. दिग्दर्शक नितीन जोशी आणि लेखक अमेय यांनी अभिनय करण्यासाठी प्रोत्साहन दिले. पहिल्यांदा रंगमंचावर अभिनय साकारताना दडपणावर मात करता आली. गाण्यांच्या श्रवणीय चाली हेही या यशाचे गमक आहे. रसिकांनीही आमच्या गाण्यांना भरभरून दाद दिली.
- तन्वी मंगेश मोरे
संगीत मल्लिका (गायन गुणवत्ता प्रमाणपत्र)
---
फोटो ओळी
- rat२४p३०.jpg-
८५०३३
सौम्या आठल्ये

संगीत मल्लिका या नाटकातील बालकलाकार सौम्या आठल्ये हिला अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले. मला या नाटकासाठी माझे आई-बाबा, दिग्दर्शक नितीन काका, संगीत दिग्दर्शक रानडे यांनी मला अभिनयाबाबत धडे दिले. माझ्याकडून अभिनय करून घेतला आणि मला प्रमाणपत्रही मिळाले. आनंद झाला. यापुढे मी अभिनयात काम करणार.
- सौम्या आठल्ये
संगीत मल्लिका (अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र)
---
फोटो ओळी
- rat२४p३१.jpg-
८५०३४
विघ्नेश नाईक

ओम कला सृष्टी मंडळ फोंडा-गोवा या संस्थेने माझ्यावर विश्वास ठेवला. ''संगीत हे बंध रेशमाचे'' या नाटकासाठी माझ्या अभिनयाला न्याय मिळाला. मला गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले. रत्नागिरीत झालेल्या स्पर्धेचा निकाल एकूण योग्यरितीने झाल्याचे स्पष्ट होत आहे.
- विघ्नेश नाईक
संगीत हे बंध रेशमाचे (अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र)
---
फोटो ओळी
- rat२४p३२.jpg-
८५०३५
समीर शिरोडकर

साध्वी कलामंच मांद्रे-गोवा या संस्थेच्या संगीत अयोध्येचा ध्वजदंड या नाटकाला स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला. या नाटकासाठी शासनाकडून पुरुष अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळाले आनंद झाला. संस्थेने टाकलेला विश्वास सार्थ झाला. एकूणच यावर्षी नाट्यस्पर्धेचा निकाल अतिशय चांगला लागला.
- समीर शिरोडकर
संगीत अयोध्येचा ध्वजदंड ( अभिनय प्रथम- रौप्यपदक)
--